वेळेसाठी दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोनाची चेन रोखण्यासाठी बाजारपेठेवर कठोर निर्बंध लादले आहेत. यामध्ये उद्योग व कारखाने सुरू ठेवले आहेेत; परंतु कारखान्यात उत्पादन होणाऱ्या वस्तू विक्रीची दुकाने मात्र बंद केली आहेत. खाजगी व सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवली आहे. सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत फिरण्यास मोकळीक दिली आहे. मात्र, दुकाने बंद ठेवली आहेत.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे तालुका अध्यक्ष प्रवीण डोके, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, नगरसेवक अतुल गावडे, माजी नगरसेवक कुंदन धोत्रे, हरिश्चंद्र बावकर, सचिन कवठे, अनिल कोरे, एजाज तलफदार, दत्तात्रय कारंजकर, महेश आंडगे, पंकज नागटिळक, अशोक फसके, रवीकिरण कोरे, रंजित भोसले, नागेश पुराणिक, नईमुद्दीन शेख, प्रकाश जगताप, शशिकांत सादिगले, गणेश लवटे, अजय कुर्डे, उमर शेख आदींसह व्यापारी उपस्थित होते.
---
व्यापारी अद्याप सावरला नाही!
वास्तविक गेल्या एक वर्षापासून कोरोनाची साखळी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी आपले स्वत:चे नुकसान होत असूनही शासनाच्या आदेशानुसार सहकार्य केले आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे किरकोळ व छोट्या व्यापार क्षेत्राचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यातून अद्याप व्यापारी सावरला नाही.
तरीही आठवड्यातून दोन दिवस सर्व व्यापार बंद ठेवण्याला व्यापारी बांधवांनी मान्य केले होते; परंतु ‘ब्रेक दि चेन’ च्या माध्यमातून लादलेले लॉकडाऊन व्यापारी उद्ध्वस्त करत आहे. तरी कठोर नियम लादून मर्यादित वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असे निवदेनात म्हटले आहे.
----मर्यादित वेळेसाठी व्यापारास परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांना देताना चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण डोके, नगरसेवक अतुल गावडे, हरिश्चंद्र बावकर, कुर्डे आदी.
----