सोलापूर : सोलापूरसह राज्यातील तापमानाचा पारा देखील उंचावला आहे. राज्यातील उन्हाची दाहकता वाढतच आहे. आज (बुधवारी) सोलापूरसह राज्यात किमान ४३.८ अंशांनी तापमानाच्या पाऱ्यात पुन्हा वाढ झाली आहे. तर सोलापूर शहरात गेल्या आठवड्याभरात ४१ अंशाच्या वर तापमान पाहायला मिळाले. शहर व परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी कमाल तापमान पुन्हा मंगळवारी ४३.४ अंशावर गेले होते.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. सातत्याने बदलत असलेल्या हवामानामुळे सोलापूरकरांना आरोग्याच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. उकाडा वाढला असून हवेचा वेग चांगला वाढला आहे. यापूर्वी १५ एप्रिल रोजी सोलापूरचे तापमान ४२.८ इतके होते. बुधवारी १६ एप्रिल २०२५ रोजी किमान तापमान ४२.२ होते तर गुरुवार दिनांक १७ एप्रिल रोजी ४२.८ होते शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी ४३.२ होते. शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी ४२.८, रविवारी २० एप्रिल रोजी ४३.००, सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी दिनांक २१ एप्रिल रोजी ४३.०० अंश होते. मंगळवारी २२ एप्रिल रोजी ४३.४ वर गेले होते आज बुधवारी ४३.८ अंश तापमान असले तरी सोलापूर शहरात बुधवारी दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान सोलापुरात हलक्या पावसाच्या सरी पडल्या, त्यामुळे दोन दिवसाच्या उष्णतेनंतर सोलापूरकरांना काही काळ हवेत गारवा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.