तसे असले तरी उमेदवार मीच आहे, तसा पक्षाकडून आपल्याला मेसेज प्राप्त झाला आहे. असे सांगत भगीरथ भालके यांनी प्रचाराची आखणी करत मागील चार दिवसांपासून प्रचारालाही सुरूवात केली आहे. येत्या दोन दिवसात पक्षाकडून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची चिन्हे आहेत.
परिचारकांची असमर्थता; भोसलेंची तयारी सुरू
भाजपकडून प्रशांत परिचारक व त्यांच्या कुटुंबातील उमेदवार निवडणुकीत उतरेल अशी चिन्हे होती. त्यांनी तशी पक्षाकडे मागणीही केली. मात्र पक्षाकडून समाधान आवताडेला उमेदवारी देण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे दिसत आहे. त्यानंतर परिचारक यांनी बाजार समितीच्या कार्यालयात सलग दोन दिवस प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन करत आपण निवडणुकीत उतरणार नसल्याचे संकेत दिले आहेत. तर त्यांचे समर्थक असलेले नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी मात्र उमेदवारी अर्ज घेऊन परिचारक नसतील तर आपण मैदानात उतरू, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे परिचारक गटाची भूमिका येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.