शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Shiv Jayanti 2020; वृक्ष लागवडीबरोबर ‘पाणी बचाव’चा संदेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:49 AM

युवकांना स्त्री रक्षणाची शिवशपथही देणार; जय महाराष्ट्र तरुण मंडळ करणार शिवछत्रपतींना अनोखे अभिवादन

ठळक मुद्देकेवळ शिवछत्रपतींच्या प्रतिमेची अथवा मूर्तीची प्रतिष्ठापना करून शिवजयंती साजरी करणे उचित होणार नाहीछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणविषयक विचार यंदाच्या शिवजयंती सोहळ्यातून आचरणात आणण्यात येणार

सोलापूर : जो व्हीआयपी रस्ता म्हणून ओळखला जातो त्या होटगी रस्त्यावरील मजरेवाडी ते विमानतळापर्यंतच्या दुभाजकाला पुन्हा आकर्षक झाडांचे वैभव मिळवून देण्यासाठी जय महाराष्ट्र तरुण मंडळ सरसावले आहे. दुभाजकात रोपे लावण्याबरोबर ‘पाणी बचाव’ यासह विविध संदेश असणारे फलक लावून खºया अर्थाने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाचे संस्थापक तथा युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख बालाजी चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

केवळ शिवछत्रपतींच्या प्रतिमेची अथवा मूर्तीची प्रतिष्ठापना करून शिवजयंती साजरी करणे उचित होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचेपर्यावरणविषयक विचार यंदाच्या शिवजयंती सोहळ्यातून आचरणात आणण्यात येणार असल्याचे बालाजी चौगुले यांनी नमूद केले. शिवछत्रपतींच्या जलनीतीचा अभ्यास केला तर साºयांनीच पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. छत्रपती शिवरायांची ही जलनीती विचारात घेऊन यंदा मजरेवाडी, भारतमाता हौसिंग सोसायटी, जय बजरंग नगरात वृक्षारोपण हाती घेण्यात येणार आहे.शिवाय व्हीआयपी रोडवरील मजरेवाडी ते विमानतळापर्यंतच्या मार्गावरील दुभाजकातील झाडे वाळून गेली आहेत. 

या दुभाजकात पुन्हा नव्याने झाडे लावून हा मार्ग पुन्हा हिरवाईने नटवण्यासाठी जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरसावले आहेत. हे समाजोपयोगी कार्य करून खºया अर्थाने शिवछत्रपतींना अनोखे अभिवादन करण्याची परंपरा यापुढेही चालू राहणार असल्याचे मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन कोकाटे यांनी सांगितले. 

शिवजयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन कोकाटे, देवेंद्र जोडमोटे, राहुल देशपांडे, पृथ्वीराज चौगुले, श्रीकांत चौगुले, दत्तात्रय शिंदे, अप्पू बिराजदार, काशिनाथ चाबुकस्वार, दादासाहेब रसाळे, नामदेव पवार, विजय सरडे, अतुल चव्हाण, अंकुश जगदाळे, कृष्णा देशपांडे, गौरव अथणे आदी प्रयत्नशील आहेत. 

शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर- चौगुले- अठरा पगड जातींना एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. शिवछत्रपतींच्या या स्वराज्यात सर्व जाती-धर्मांना समान न्याय होता. शिवछत्रपतींनी अनेक धोरणे राबवली. त्यातील जलनीती, पर्यावरण हे विषय जय महाराष्ट्र तरुण मंडळाने घेतले असून, होटगी रोडवरील काही अंतरावरील दुभाजकात झाडे लावण्याबरोबर त्या ठिकाणी पाणी बचतीचे महत्त्व सांगणारे संदेश लावण्यात येणार असल्याचे मंडळाचे संस्थापक बालाजी चौगुले यांनी सांगितले. अनेक कार्यक्रम राबवून शिवरायांच्या विचारांची प्रचिती यंदाच्या शिवजयंती उत्सवात शिवप्रेमींना पाहावयास मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जय महाराष्ट्र तरुण मंडळाने यंदा शिवजयंतीनिमित्त स्त्री रक्षणासाठी परिसरातील युवकांना शिवशपथ देण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. संस्थापक बालाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंतीचा हा सोहळा ‘न भूतो न भविष्यती’ असा होईल. -सचिन कोकाटे.

आजच्या युवकांना शिवछत्रपती समजावेत, यासाठी मंडळाच्या वतीने शिवजागर करण्यात येणार आहे. शिवछत्रपतींचे विचार आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम निश्चित करण्यात येणार आहे. -नामदेव पवार

होटगी रोडवरील मजरेवाडी भागात गेल्या ११ वर्षांपासून शिवजयंती साजरी करण्यात येते. यंदा जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. होटगी रोडवरील दुभाजकात झाडे लावून व्हीआयपी रस्ता फुलवण्यात येणार आहे. शिवप्रेमींनी सहभागी व्हावे.-दत्तात्रय शिंदे.

माझ्यासारख्या लिंगायत समाजाला मंडळात स्थान देऊन मंडळाने छत्रपतींचा समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवछत्रपतींचे विचार घराघरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत.-अप्पू बिराजदार

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजenvironmentपर्यावरण