केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी 'म्होरक्या' चित्रपटाची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 07:08 PM2019-05-08T19:08:07+5:302019-05-08T19:15:30+5:30
गेल्या वर्षी या चित्रपटाची निवड याच फेस्टिवलमध्ये झाली होती. पण केरळमध्ये आलेल्या महापूर प्रलयामुळे केरळ सरकारने तो रद्द कार्यक्रम रद्द केला होता.
मुंबई/सोलापूर - अनेक अडचणी पार करत अतिशय मेहनतीने सोलापूर आणि परिसरातील कलाकारांच्या परिश्रमातून साकारण्यात आलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'म्होरक्या' द लीडर हा चित्रपट केरळ इंटरनॅशनल चिल्डरन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार असल्याची माहिती चित्रपटाचे दिगदशर्क अमर देवकर यांनी दिली. म्होरक्या चित्रपटाला 2018 मध्ये राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.
चित्रपटाचे स्क्रिनिंग 11 व 13 मे रोजी होणार आहे.
गेल्या वर्षी या चित्रपटाची निवड याच फेस्टिवलमध्ये झाली होती. पण केरळमध्ये आलेल्या महापूर प्रलयामुळे केरळ सरकारने तो रद्द कार्यक्रम रद्द केला होता. पण, या वर्षी पुन्हा चित्रपटाची निवड झाली ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असे अमर देवकर म्हणाले. दरम्यान म्होरक्याला चित्रपटाला 65 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात 2 पुरस्कार मिळवले होते. चित्रपटामध्ये बार्शीचा रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन मार्फत बनलेला हा चित्रपट येत्या ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे, असे दिग्दर्शक अमर देवकर यांनी सांगितले.