सोलापूर : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे अनुदान मागणी सेंट्रल बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदाच्या संपूर्ण शाखांनी अद्यापही केली नाही. जिल्हा उपनिबंधकांनी सहावेळा पत्रे दिल्यानंतरही राष्टÑीय बँकांच्या २२० शाखांनी अद्यापही प्रस्ताव दाखल केले नाहीत.
मुद्दल, व्याजासह भरलेल्यांचे अनुदानासाठी प्रस्ताव बँकांनी निबंधकांकडे पाठवावे लागतात. बँका शेतकºयांकडून अगोदरच व्याजासह रक्कम वसूल करतात. वेळेवर कर्ज भरणाºयांचे व्याज बँकांना मिळते मात्र अनुदान नाही आले तर लाभार्थी याला मुकतो. अशी व्यथा शेतकºयांकडून मांडली जात आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही केवळ शेतकºयांसाठी राबवली जाते. घेतलेले एक लाखापर्यंत कर्ज वेळेवर भरणाºया शेतकºयांची व्याजाची ७ टक्के इतकी रक्कम शासन डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून भरते. तीन लाखांपर्यंतचे कर्ज वेळेत भरणाºया शेतकºयांचे ५ टक्के व्याज शासन व दोन टक्के व्याज शेतकºयांनी भरावयाचे असते. यासाठी व्याजाची रक्कम बँकांनी प्रस्ताव निबंधकाकडे पाठवावे लागतात. मागील दोन-तीन वर्षांत राष्टÑीयीकृत बँकांच्या अनेक शाखांचे प्रस्तावच अनुदान मागणीसाठी येत नाहीत. यावर्षीही अशी स्थिती आहे.
यासाठी २० कोटींची तरतूद केली असून, १४ कोटी रुपये जिल्हा उपनिबंधकांकडे दिले आहेत. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या प्रस्तावानुसार ७ कोटी ३४ लाख खर्च झाला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी तोंडी सूचना शिवाय सहावेळा लेखी पत्रेही दिली आहेत. असे असतानाही राष्टÑीयीकृत बँकांच्या ३३३ शाखांपैकी ११३ शाखांचेच अनुदानासाठी प्रस्ताव आले आहेत. उर्वरित २२० शाखांचे प्रस्ताव येत नसल्याने अनुदान परत जाण्याची शक्यता आहे.
प्रमुख राष्टÑीयीकृत बँकांचेही प्रस्ताव नाहीत
- - सोलापूर जिल्हा बँकेच्या सर्वच शाखांच्या प्रस्तावानुसार अनुदान जमा झाले आहे, बँक आॅफ इंडियाच्या १६, बँक आॅफ महाराष्टÑच्या २५,स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ३८, विदर्भ कोकण बँकेच्या १६, युनियन बँक आॅफ इंडियाच्या ११ शाखांनी अनुदानासाठी प्रस्ताव दिले नाहीत.
च्आयसीआयसीआय बँकेच्या सर्वच २९,सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या १४, बँक आॅफ बडोदाच्या १४,अॅक्सीस बँकेच्या ७, देना बँकेच्या ५, एचडीएफसीच्या ७, रत्नाकर बँकेच्या दोन्हीही शाखांनी अनुदानासाठी प्रस्ताव दिले नाहीत. प्रस्ताव दिले नाही तर बँकेचे नुकसान होत नाही; मात्र शेतकºयांना व्याजाची रक्कम मिळत नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.
वारंवार पत्र दिल्याने व बैठकीत जिल्हाधिकाºयांनी सूचना दिल्याने ११३ शाखांचे प्रस्ताव आले आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीतही सूचना दिल्या आहेत.-अविनाश देशमुखजिल्हा उपनिबंधक