महूद-येडगेवस्ती येथील अंजना येडगे ही महिला २६ मे रोजी सायंकाळी ७च्या सुमारास शेतातील मिरचीचे पीक जळू लागल्यामुळे पाणी देण्यासाठी समाईक विहिरीवर मोटर सुरू करण्यासाठी गेली होती. त्यावेळी राजेश परमेश्वर येडगे, परमेश्वर तुकाराम येडगे व आशाबाई परमेश्वर येडगे यांनी तेथे येऊन अंजना हीस तुम्ही विहिरीवरील मोटर चालू करायची नाही व परत या विहिरीवर यायचेही नाही, असे म्हणून धक्काबुक्की करू लागले.
आईच्या भांडणाचा आवाज ऐकून मुलगा उमेशने तेथे येऊन आईला का मारता म्हणून विचारले. त्यावेळी राजेश येडगे याने तू येथे का आला म्हणून त्यालाही शिवीगाळ करत तेथेच पडलेली वीट डोक्यात घातली, तर परमेश्वर येडगे याने हातातील दगड त्याच्या कपाळावर मारून जखमी केले. आशाबाई येडगे हिने त्याला शिवीगाळ करून त्याच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत उमेश सुरेश येडगे याने तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.