शेतकरी प्रतिनिधी, दूध संघ व खासगी दूध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यात विविध चर्चा झाली. दुधाचे दर तातडीने वाढविले जाणार असल्याने व दुधाला एफ.आर.पी.चा कायदा (हमीभाव) करण्याचे धोरण घेतले जाणार असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी आश्वासन दिले.
यावेळी बैठकीत दूग्ध विकास मंत्री सुनील केदार, माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, किसान सभेचे डॉ. अजित नवले, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, रयतचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, रयतचे प्रवक्ते प्रा सुहास पाटील, रयतचे प्रवक्ते भानुदास शिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, उमेश देशमुख, आ. डॉ. किरण लहमटे, शेतकरी प्रतिनिधी धनंजय धोरडे, विठ्ठल पवार, रणजित देशमुख, प्रकाश कुतवळ, दशरथ माने, गोपाळराव म्हस्के प्रधान सचिव अनुप कुमार आदी उपस्थित होते.
----
बैठकीतील निर्णय
पशुधन लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे ठरले. पशु औषधांचा स्टाॅक जाहीर करून शेतकऱ्यांना औषधांची उपलब्धतता सांगणे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्वरित करणे. गीर गाई, थारपारकर, देवणी, राठी, खीलार या जातींच्या गाईंचे संगोपन वाढविण्याचाही अधिक लक्ष देण्याचे घोषित केले. दूध संकलन केंद्रांवर दूध पावत्यांवर दूध संघाचे नाव नमूद करणे. दूध तपासणी मशीन योग्यता तपासणे. यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करणे.
---