शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

जुळे सोलापूरात दुषित पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 3:05 PM

सोलापूर शहरातील जुळे सोलापूरात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास दुषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला़

ठळक मुद्देउजनीतून भीमेत सोडलेले पाणी औज बंधाºयात येण्यास विलंबशहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला

सोलापूर : सोलापूर शहरातील जुळे सोलापूरात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास दुषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला़ नेहमी स्वच्छ स्वरूपात येणारे पाणी शनिवारी लालसर म्हणजेच दुषित स्वरूपात आले़उजनीतून भीमेत सोडलेले पाणी औज बंधाºयात येण्यास विलंब झाल्याने गुरूवारपासून शहराला एक आठवडा शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. औज बंधारा रिकामा करून चिंचपूर बंधाºयात पाणी घेतल्यानंतर मनपा प्रशासनाने २५ मार्चला उजनीतून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे खात्याला पत्र दिले. पण पाटबंधारे खात्याने चैत्री वारीचे नियोजन डोळ्यांसमोर ठेवत उशिराने उजनीतून पाणी सोडले. पहिल्यांदा १५ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर १३५00 क्युसेक्स आणि पंढरपूरला पाणी पोहोचल्यावर ९000 क्युसेक्स फ्लो करण्यात आला. बुधवारी सायंकाळी पाच वाजता पुळूज बंधाºयात पाणी आल्यावर पाण्याचा फ्लो ८000 करण्यात आला आहे. उन्हाचा कडाका व नदीचे पात्र कोरडे असल्याने दररोज २0 किलोमीटर याप्रमाणे भीमेतून पाणी पुढे सरकत आहे. औज बंधाºयात पाणी येण्यासाठी आणखी ८४ किलोमीटरचा प्रवास आहे. याचा विचार केल्यास २ एप्रिलला औज बंधाºयात पाणी पोहोचेल असा अंदाज आहे. ऐनवेळी बदल झाल्यामुळे पाणी येणार या भरवशावर असणाºयांना मोठा फटका बसणार आहे. औज व चिंचपूर बंधारा भरल्यानंतर पाण्याचे नियोजन तीन दिवसांवर आणण्यात येणार आहे. एक दिवसाची पाळी पुढे गेल्याने किमान दोन आठवडे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका