कामती : मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागात साकारत असणारा नागपूर-रत्नागिरी या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातून २२ कि.मी जातो. त्याचबरोबर विजयपूर-मोहोळ याही महामार्गाचे नूतनीकरण झाल्याने सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यातील दळण-वळणाची गती वाढणार आहे.
सोलापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ आहे. या रस्त्याचे तीन टप्प्यात काम होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मंगळवेढा-सोलापूर हा ५६ कि.मी. रास्ता आहे. हा सध्या ३८ कि.मी.पूर्ण झाला आहे. ५६ किमी पैकी जवळपास २२ किमी रस्ता मोहोळ तालुक्यात येतो. ११४१ कोटी नियोजित खर्चाच्या अंदाजे यातील निम्मा खर्च मोहोळ तालुक्यातील रस्त्यासाठी खर्ची लागत आहे.
दुसरीकडे मंद्रुप-मोहोळ हा ४६५ क्रमांकाचा महामार्ग आहे. मागील अनेक वर्षांपासून तो दुरुस्तीची मागणी होत होती. गेल्यावर्षी या महामार्गाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. सोलापूर-रत्नागिरी व मंद्रुप-मोहोळ या दोन्ही महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने दळण-वळण सोपे झाले आहे. दळण-वळणाला गती मिळाल्याने तालुक्याच्या विकासात भर नक्की पडणार आहे.
मंद्रुप-मोहोळ हा मार्ग चौरस्ता होण्यासाठी मागणी होत आहे. वाढत्या वाहनांच्या संख्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मोहोळ तालुक्याच्या अंतर्गत असणारा कुरुल-पंढरपूर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा रास्ता दळण-वळणास बाधा ठरत आहे. तालुक्यातील लहान-मोठे रस्ते वगळता मोठे इतर रस्ते दर्जेदार झाले आहेत. परिणामी जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यातील दळण-वळणाला गती प्राप्त झाली आहे.
--
सोलापूर- रत्नागिरी झाल्यावर व मंद्रुप-मोहोळ या रस्त्याच काम पूर्ण झाल्याने दळण-वळण सोपे झाले आहे. मंद्रुप-मोहोळ या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यास सोयीचे होणार आहे. सध्या वाहनांची संख्या जास्त असल्याने अपघाचे प्रमाण वाढले आहे.
-अशोक भोसले
उपसरपंच, कामती बुद्रुक