एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही : प्रणिती शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:00 PM2019-02-01T13:00:42+5:302019-02-01T13:01:57+5:30
बºहाणपूर : भाजपा सत्तेत आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत सर्वांनाच अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. एमआयएम आणि आरएसएस ...
बºहाणपूर : भाजपा सत्तेत आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत सर्वांनाच अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. एमआयएम आणि आरएसएस हे दोन्ही पक्ष व संघटना भाजपाच्या एजंटगिरीचे काम करीत आहेत. काँग्रेसच्या मतांचे फोडाफोडीचे राजकारण ते करीत असले तरी एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
बºहाणपूर येथे शिवराज म्हेत्रे युवा प्रतिष्ठानच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिध्दाराम म्हेत्रे होते तर व्यासपीठावर गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे, अशपाक बळोरगी, रियाज हुंडेकरी, विश्वनाथ भरमशेट्टी, यंग सेवादल ब्रिगेडचे सुदीप चाकोते, नन्हेगावचे सरपंच सिध्दार्थ गायकवाड, शिवराज म्हेत्रे, एजाज मुतवल्ली, हमीद पीरजादे, सरपंच सायराबानो फुलारी, सुनीता हडलगी, सुवर्णा मलगोंडा, व्यंकट मोरे, शाकीर पटेल आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, अशपाक बळोरगी,शिवराज म्हेत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. सेस फंडातून मंजूर झालेल्या मोटारीचे हन्नूर येथील शेतकºयांना वितरण करण्यात आले. यावेळी चंद्रकांत जंगले गुरूजी, मैनोद्दीन पटेल, अंबणप्पा भंगे, तुकाराम दुपारगुडे, इसहाक पटेल, संजय बाणेगाव, प्रशांत पाटील, संजय अचलारे, हिरामणी नारायणकर, अशपाक अगसापुरे, शैलेश पाटील, अभूजर पटेल, पांडुरंग चव्हाण उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम पटेल यांनी केले तर आभार नासीर पटेल यांनी मानले.
प्रणिती शिंदेंची भाजपावर टीका
- आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर चौफेर टीका केली. त्या म्हणाल्या, योगींना मुख्यमंत्री बनवून भाजपाने हिंदुत्वाचा अपमान केला. फसवी उज्ज्वला गॅस योजना आणली. पिवळ्या रेशन कार्डाच्या सवलती काढून घेतल्या. विधानसभेमध्ये विरोधकांचा गळा दाबला जात असून, लोकशाहीचा अंत सुरू आहे. दुष्काळ दूर करण्याऐवजी भाजपाने सीएम चषक आयोजित करून शेतकºयांची चेष्टा चालवल्याचे त्यांनी सांगितले.