शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही : प्रणिती शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:00 PM

बºहाणपूर : भाजपा सत्तेत आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत सर्वांनाच अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. एमआयएम आणि आरएसएस ...

ठळक मुद्देयोगींना मुख्यमंत्री बनवून भाजपाने हिंदुत्वाचा अपमान केला - प्रणिती शिंदे फसवी उज्ज्वला गॅस योजना आणली. पिवळ्या रेशन कार्डाच्या सवलती काढून घेतल्या - प्रणिती शिंदे विधानसभेमध्ये विरोधकांचा गळा दाबला जात असून, लोकशाहीचा अंत सुरू - प्रणिती शिंदे

बºहाणपूर : भाजपा सत्तेत आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत सर्वांनाच अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. एमआयएम आणि आरएसएस हे दोन्ही पक्ष  व संघटना भाजपाच्या एजंटगिरीचे काम करीत आहेत. काँग्रेसच्या मतांचे फोडाफोडीचे राजकारण ते करीत असले तरी एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.

बºहाणपूर येथे शिवराज म्हेत्रे युवा प्रतिष्ठानच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिध्दाराम म्हेत्रे होते तर व्यासपीठावर गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे, अशपाक बळोरगी, रियाज हुंडेकरी, विश्वनाथ भरमशेट्टी, यंग सेवादल ब्रिगेडचे सुदीप चाकोते, नन्हेगावचे सरपंच सिध्दार्थ गायकवाड, शिवराज म्हेत्रे, एजाज मुतवल्ली, हमीद पीरजादे, सरपंच सायराबानो फुलारी, सुनीता हडलगी, सुवर्णा मलगोंडा, व्यंकट मोरे, शाकीर पटेल आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, अशपाक बळोरगी,शिवराज म्हेत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. सेस फंडातून मंजूर झालेल्या मोटारीचे हन्नूर येथील शेतकºयांना वितरण करण्यात आले. यावेळी चंद्रकांत जंगले गुरूजी, मैनोद्दीन पटेल, अंबणप्पा भंगे, तुकाराम दुपारगुडे, इसहाक पटेल, संजय बाणेगाव, प्रशांत पाटील, संजय अचलारे, हिरामणी नारायणकर, अशपाक अगसापुरे, शैलेश पाटील, अभूजर पटेल, पांडुरंग चव्हाण उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम पटेल यांनी केले तर आभार नासीर पटेल यांनी मानले.

प्रणिती शिंदेंची भाजपावर टीका- आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर चौफेर टीका केली. त्या म्हणाल्या, योगींना मुख्यमंत्री बनवून भाजपाने हिंदुत्वाचा अपमान केला. फसवी उज्ज्वला गॅस योजना आणली. पिवळ्या रेशन कार्डाच्या सवलती काढून घेतल्या. विधानसभेमध्ये विरोधकांचा गळा दाबला जात असून, लोकशाहीचा अंत सुरू आहे. दुष्काळ दूर करण्याऐवजी भाजपाने सीएम चषक आयोजित करून शेतकºयांची चेष्टा चालवल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाcongressकाँग्रेस