सोलापूर : सोलापूर भाजपच्या कार्यकर्त्यांचे गाºहाणे ऐकून घेण्यासाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बैठकीला दोन्ही मंत्र्यांनी दांडी मारली़ बैठकीत कार्यकर्त्यांनी गटबाजीबाबत केलेल्या तक्रारीवर दानवे यांनी तुम्हीच यावर तोडगा सुचवा, असे म्हणून सर्वांना बुचकळ्यात टाकले.
आषाढी एकादशीनिमित्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पंढरपूर दौºयावर आले होते़ दर्शन आटोपून ते सोलापुरात आले. हॉटेल बालाजी सरोवर येथे त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली़ या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस रामचंद्र जन्नू, राजकुमार पाटील, राजकुमार काकडे, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी आदी उपस्थित होते़ मात्र या बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आलेच नाहीत़ बैठक सुरू झाल्यावर सरचिटणीस रामचंद्र जन्नू यांनी दोन मंत्र्यांतील वादामुळे भाजपात गटबाजी उफाळल्याची तक्रार केली. अशोक यनगंट्टी, राजू पाटील, वीरभद्रेश बसवंती, राजकुमार काकडे आदींनी गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान होत आहे.
जुन्या कार्यकर्त्यांना सन्मान दिला जात नाही. दुसºया पक्षातून आलेल्यांना पदे, निवडणुकीची उमेदवारी दिली जाते, अशी तक्रार केली. अनेकांनी दोन्ही मंत्र्यांनी मतभेद संपवावा़ भाजपचे शहराध्यक्ष बैठक बोलवतात, दुसरीकडून बैठकीला जाऊ नका,असा निरोप येतो़ यामुळे आम्ही काय करायचे, अशा अनेक प्रश्नांवर दानवे वैतागले. मलाच नव्हे तर वरिष्ठांनाही सोलापुरात काय चालले याची माहिती आहे. ही गटबाजी कशी संपवायची याचा तोडगा तुम्हीच सांगा, असा प्रतिसवाल करून दानवे यांनी सर्वांना बुचकळ्यात टाकले. कोणत्याच निर्णयाविना बैठक संपली.
बैठक संपल्यानंतर शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह दानवे यांनी दोन्ही मंत्र्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या बैठकीत काहीच निष्पन्न न झाल्याने कार्यकर्त्यांची मात्र निराशा झाली़ दोन्ही मंत्र्यांच्या घरी जाऊन दानवे यांनी काय चर्चा केली हे मात्र समजू शकले नाही़ सोमवारी रात्री मुक्कामानंतर मंगळवारी सकाळी ते पुढील दौºयावर रवाना झाले.