सोलापूर : लॉकडाऊनमध्ये अन्य आजारांच्या रुग्णांचे खूपच मोठ्या प्रमाणात हाल झाले, त्यात मनोरुग्णांना कोरोनाचा मोठा फटका बसला. गेल्या काही महिन्यांत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाता न आल्याने व औषधे चुकल्याने त्यांच्या समस्यांत वाढ झाली आहे. देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर रुग्णालयात मर्यादित सेवा देण्यात येत होत्या. त्यामुळे ह्रदय विकार, मधुमेह सारख्या आजारांसोबतच मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांनाही त्रास सहन करावा लागला. अनेकांना सिव्हिल हॉस्पीटलमधील मानसिक आरोग्याच्या ओपीडीध्ये जाता आले नाही. काहींंनी बाहेरुन ओषधे मिळविली तर काहींना तेही घेणे शक्य झाले नाही. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर इतर आजाराच्या रुग्णांना सेवा देणे सुरु झाले आहे. मात्र, या दरम्यान अनेक रुग्णांच्या समस्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.रुग्णांमध्ये कोणता त्रास वाढलामधुमेह, ह्रदय विकार सारख्या रुग्णांना नियमितपणे औषधे घ्यावी लागतात. त्याचप्रमाणे काही मानसिक आजारामध्ये नियमितपणे औषधे घ्यावी लागतात. लॉकडाऊनमध्ये औषधे घेता न आल्याने आता मानसिक रुग्णामध्ये बडबड करणे, झोप न लागणे, साध्या गोष्टींवर राग येणे, घरच्यांना त्रास देणे, आदी लक्षणे वाढल्याचे दिसत आहे.सिव्हिलच्या ओपाडीमध्ये तपासण्यासाठी येणाऱ्या मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांमध्ये समस्यादेखिल वाढल्या आहेत. या रुग्णांना उत्कृष्ट सेवा देत आहोत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक नियमितपणे रुग्णाला घेऊन सिव्हिलमध्ये येत आहे. ही चांगला बाब आहे.- डॉ. कुंदन कांबळे, मानसोपचार तज्ञ, शासकिय रुग्णालयपुनर्तपासणीसाठी बोलविण्याच्या कालावधीत वाढजानेवारी 2020 मध्ये रुग्णाला दर 15 दिवसात एकदा तपासणीसाठी बोलविण्यात येत होते. त्यावेळी रोज 100 रुग्णांची तपासणी व्हायची. आता रुग्ण संख्या दुपटीने वाढली आहे. म्हणून सिव्हिलमध्ये रुग्णाला दर महिण्यानंतर तपासणीसाठी बोलविण्यात येत आहे. तरी देखिल जानेवारी 2021 मध्ये रोज 100 रुग्णांची तपासणी होत आहे. जानेवारी 2020 मध्ये अॅडमीट होणारे 15 रुग्ण अॅडमीट होते. आता कोरोना असल्याने जास्त रुग्णांना अॅडमीट केले जात नाही. त्यामुळे जानेवारी 2021 मध्ये अॅडमीट होणारे सहा रुग्ण होते.
लॉकडाऊनकाळात औषधं चुकली; मनोरूग्णांची रांग 'ओपीडी'त वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 1:17 PM