सोलापूर : एमआयटी विश्वशांती गुरुकुल संचलित राष्ट्रीय सरपंच संसदने उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गाव दत्तक घेतले. गावातील रस्ते आणि शाळा डीजीटल करण्याचा मानस असून ग्रामपंचायत सोलार केली जाणार असल्याची माहिती सदस्या परिणीता शिंदे यांनी दिली.
राष्ट्रीय सरपंच संसदचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक योगेश पाटील (नाशिक), प्रकाश महाले व पुणे विभाग महिला समन्वक जलकन्या भक्ती जाधव, मोहोळ तालुका महिला समन्वयक सुनिता कोरे यांनी ९ एप्रिल रोजी पाकणी गावाला भेट दिली. या भेटीत सरपंच संघटनेची चर्चा झाली. कामकाज कसे करायचे याबद्दल नियोजन करण्यात आले. यावेळी पाकणी गाव दत्तक घेतल्याचे समन्यवयक योगेश पाटील यांनी जाहीर केले.
या भेटीत चार शिवरस्ते, शेतक-यांचे २५ गट स्थापन करुन माती परीक्षणाच्या मदतीने पीकपद्धत बदलणार, ग्रामपंचायत सोलार सिस्टीमवर चालवणार आणि शुद्ध पाणी घरोघरी पोहोचवण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.
यावेळी सरपंच बालाजी येलगुंडे, उपसरपंच विजय शिंदे, मनीषा येलगुंडे, सोनाली वाले, मनीषा क्षीरसागर, श्रीकांत येलगुंडे, सदाशिव सलगर, बापूसाहेब गुजर, आबा यादव, आबा कोष्टी, प्रियंका कोष्टी, विजयसिंह शिंदे, नंदकुमार गुंड, वाघमारे, गायकवाड पस्थित होते.