शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; जाणून घ्या कारण

By appasaheb.patil | Published: August 24, 2022 5:42 PM

पावसाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांशी साधला आमदार प्रणिती शिंदे यांनी संवाद

सोलापूर  : सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरामधील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीवासिय कुटुंबियांना मोबदला व त्यांचे पुनर्वसन करण्याकारिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.

 यामध्ये सोलापूर शहरामध्ये रेल्वेच्या जमिनीवरील गरीबी हटाव नं. १ व २ व इतर ठिकाणी मोठ्याप्रमाणात झोपडपट्टी निर्माण झालेली आहे. सदर झोपडपट्टीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरीक राहत आहेत. सदर ठिकाणी गोर-गरीब, बांधकाम कामगार, विडी कामगार व इतर कामगार राहत असून त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन रोजंदारीवर अवलंबून आहे. सदर भागामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाईप लाईन, लाईट इ. सोयी-सुविधा पुरविण्यात आलेले आहेत. तसेच तेथील रहिवाश्यांकडून महानगरपालिका टॅक्स घेत असून त्यांना लाईट बिल पण भरावे लागत आहे. या भागातील नागरीकांना रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आलेली आहे. यामुळे तेथील कुटुंबिय बेघर होणार असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदर रहिवाश्यांचे पुर्नवसन करणे व त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली. सदर प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले कि, रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी वासीयांचा विषय गंभीर असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. याकरीता लवकरात लवकर संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.  

 

टॅग्स :SolapurसोलापूरEknath Shindeएकनाथ शिंदेPraniti Shindeप्रणिती शिंदेPoliticsराजकारण