शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

आमदार प्रणिती शिंदेंचे सोलापूर महापालिकेला पत्र; जाणून घ्या पत्रातील महत्वाच्या गोष्टींविषयी

By appasaheb.patil | Published: September 06, 2022 3:53 PM

लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर : ३ फुटांपेक्षा मोठ्या मुर्तीचे संकलन महापालिकेनेच कराव्यात व त्या गणेश मुर्तीचे पावित्र्य जपत सोलापूर महानगरपालिकेने ठरविलेल्या ठिकाणी विधीवत गणेश मुर्तीचे विसर्जन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात यावे अशा मागणीचे पत्र आ. प्रणिती शिंदे यांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सोलापूर शहरातील सर्वच मध्यवर्ती सार्वजनिक महामंडळांच्या अंतर्गत गणेशोत्सव साजरा करणारी गणेश मंडळे यांच्या ३ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मुर्तीचे विसर्जन शहराबाहेरील खाणीमध्ये करण्याचे सोलापूर महानगरपालिकेचे नियोजन असल्याचे समजते.  याबाबत शहरातील प्रत्येक विभागात असलेले विसर्जन कुंड, तलाव याठिकाणीच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेश उत्सव मंडळाच्या ३ फुटापेक्षा मोठ्या गणेश मुर्ती एकत्रित जमा करून घ्याव्यात व दरवर्षीचा विसर्जन सोहळा अत्यंत आनंदात, खेळीमेळीने, विनाकलह संपन्न करावा. विसर्जनानंतर गणेश उत्सव मंडळाकडून जमा करुन घेतलेल्या 3 फुटापेक्षा मोठ्या मुर्तीचे पावित्र्य जपत सोलापूर महानगरपालिकेने ठरविलेल्या ठिकाणी विधीवत गणेश मुर्तीचे विसर्जन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात यावे असेही आ. शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

याचशिवाय विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्यकुंड, आवश्यक सोयी-सुविधा, जीवरक्षक यांची परीपूर्ण व्यवस्था करावी व घाईगर्दीत कुणाही निरपराध व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यु होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुक मार्गावर पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार रुग्णवाहीका, अग्निशमन वाहन यासह तातडीची मदत यंत्रणा कार्यन्वित करण्यात यावी व कोणतीही दुर्घटना घडणार नाही यादृष्टीने काटेकोर नियोजन करून व्यवस्था उभारण्यात यावी अशाही सुचना पत्रात शेवटी केल्या आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेGanesh Mahotsavगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सव