सोलापूर : कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. कोणाच्याही हाताला काम नाही़ उपासमारीची वेळ आली आहे, न्हवे तर भूक बळी जात आहेत, अनेक लोक आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत आहेत. राज्यातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे पण व्यवसायच बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाही तरी शासनाने बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी घेतलेले कर्ज त्वरीत माफ करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पंढरपुरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाºयांना देण्यात आले.
दरम्यान, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे व तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो महिलांचा सहभाग होता़ मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने मोठमोठ्या उद्योग पतींना कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ केली आहेत,, महिला बचत गटाची तर खूप छोटे कर्ज आहे ते संपूर्ण माफ होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ही नम्र विनंती,, साहेब महिला खूप अडचणीत आहेत, कसलेही काम नाही ,त्यांच्या घरच्या पुरुष मंडळींना देखील काम नाही प्रचंड हलाखीचे जीवन जगत आहेत आणि वरून रोजच मायक्रो फायनान्स गुंडांचा त्रास यामुळे अनेक महिला निराशेचे जीवन जगत आहेत अशातच पंढरपूर येथील मनीषा निकम या महिलेने या गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे, आशा अनेक महिला आत्महत्या करत आहेत, ,तरी कृपया मायक्रो फायनान्स कंपनीना विम्याचे सर्टिफिकेट देण्यासाठी आदेश द्यावे आणि संपूर्ण वसुली थांबवावी ही विनंती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.