सोलापूर/उस्मानाबाद : कत्तलखान्याची चौकशी करायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने केलेल्या हल्ल्यात उस्मानाबाद पोलिसांसह सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
उस्मानाबाद परिसरात मागील अनेक वर्षांपासून जनावरांच्या बेकायदेशीर कत्तली करून ते मांस वेगवेगळ्या ठिकाणी पार्सल केले जात असल्याची माहिती बार्शीचे प्राणी संरक्षण अधिकारी धन्यकुमार पटवा यांना मिळाली. त्यांनी ही माहिती सोलापुरातील गोरक्षक सतीश शिरसिल्ला, पवन कुमठे, सिद्राम चिरकोपल्ली, प्रशांत परदेशी यांना दिली. त्यांनी ही माहिती उस्मानाबादच्या पोलिसांना दिली. तेव्हा या कत्तलखान्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले. सोबत सोलापुरातील सामाजिक कार्यकर्तेही होते. तिथे सुमारे तीन ट्रक भरून मांस पार्सल केले जाणार होते.
दरम्यान, एका जमावाने पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी धन्यकुमार पटवा यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र उस्मानाबादच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ही नेहमीची रुटीन कारवाई होती. फक्त त्या ठिकाणी विरोध झाला होता.