यशवंत सादूल
सोलापूर : मोबाईलच्या रेडिएशनचा परिणाम होऊन मागील काही वर्षे चिमण्यांची संख्या घटली होती़ त्यासोबत वाढत्या काँक्रिटीकरणामुळे त्यांची वस्तीस्थाने नष्ट झाली होती़ पण अलीकडे चिमण्यांसोबत मानवी वस्तीशी सलगी करून राहणाºया सर्वच पक्ष्यांच्या प्रजातींनी मोबाईल टॉवरच्या रेडिएशनची सवय करून घेतल्याने त्यांच्या संख्येत भर पडली आहे. काही पक्ष्यांनी टॉवरवरच घरटी बांधली आहेत. सोलापूरच्या कन्ना चौकातील मोबाईल टॉवरवर शेकडो पक्षी बसल्याचे सकारात्मक चित्र नुकतेच दिसून आले. चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांच्या वस्तुस्थितीवर ‘लोकमत’ने नुकताच धांडोळा घेत काढलेला हा निष्कर्ष आहे.
सन २००७ -२०१५ दरम्यानच्या कालावधीत मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा परिणाम म्हणून पक्ष्यांची संख्या घटत गेली, अशी सर्वसामान्य समजूत होती़ अनेक पक्षीमित्रांनीही असे मत मांडले होते़ पण ही समजूत चुकीची ठरली आहे.
आता मोबाईल टॉवरवरच पक्षी बसत आहेत. अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय असलेला मोबाईल टॉवर व त्यामुळे रोडावणारी पक्ष्यांची संख्या. पण ती संख्या कमी होण्यामागे अनेक कारणांपैकी एक कारण आहे.
अलीकडे अनेक पक्ष्यांनी टॉवरवर घरटे बांधल्याचे दिसून येते. सोलापुरातील अनेक ठिकाणी बोरड्या या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे चक्क टॉवरवर बसलेले दिसून येतात. डिसेंबर ते एप्रिल या चार-पाच महिन्यांकरिता हे पक्षी टॉवर रेडिएशनच्या संपर्कात येतात, त्यामुळे त्याची तीव्रता कमी भासते, स्थानिक पक्ष्यांनीही रेडिएशनची सवय करून घेतल्याने त्यांची संख्या वाढत आहे. टॉवर उंच असल्याने पक्ष्यांना बसणे सोपे होते म्हणून त्यावर बसतात- सिद्राम पुराणिक, पक्षीमित्र
मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा पक्ष्यांवर परिणाम होतो, असा काढलेला निष्कर्ष अर्धवट अभ्यासावर आधारित होता. सध्या तरी टॉवरचा कोणताच परिणाम पक्ष्यांवर होत नाही, असे दिसून येते. मागील काही वर्षांत चिमण्या कमी झाल्या ते त्यांच्या वस्ती नष्ट झाल्यामुळे. पण सध्या बांधण्यात येणाºया उड्डाण पुलामुळे सर्वच पक्ष्यांना राहण्याची सोय होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष्यांची संख्या वाढत आहे़ - भरत छेडावन्यजीव मित्र
कबुतर, बुलबुल, रॉबिन, सूर्यपक्षी, साळुंकी, कावळा, चिमणी अशा मानवी वस्तीशी सलगी करून राहणाºया पक्ष्यांवर सुरुवातीला रेडिएशनचा परिणाम झाला, असे म्हणतात़ पण त्याला ठोस पुरावा नाही. मोबाईल कंपन्यांनी टॉवरची संख्या वाढविल्याने रेडिएशनची विभागणी केली़ त्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली असावी. पक्ष्यांच्या अन्न-पाण्याची, राहण्याची सोय होऊ लागल्याने पक्ष्यांची वाढ होऊ लागली़ त्यांना असलेल्या रेडिएशनची सवय झाली आह़े-नागेश राव,पक्षीमित्र