सोलापूर : लॉकडाऊन काळात रूजू झालेल्या वर्क फ्रॉम होम आणि आॅनलाइन शिक्षणप्रणालीमुळे मोबाईल खरेदीसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन दिवसात ५० लाखांची मोबाईल क्षेत्रात उलाढाल झाली असून नोकरदार, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोबाईल खरेदीला अधिक पसंती दिल्याचे सांगण्यात आले.
कोरोना या विषाणूजन्य आजार वाढत आहे. रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला़ अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली. त्यामुळे लॉकडाऊन काळात ९० टक्के नोकरदारांनी मोबाईलवरूनच वर्क फ्रॉम पूर्ण केले. शिवाय बºयाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अपूर्ण राहिल्याने राहिलेला अभ्यासक्रम संबंधित शिक्षकांनी आॅनलाइनव्दारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पूर्ण करून घेतला़ त्यामुळे लॉकडाऊन काळात मोबाईलचे महत्व वाढले.-----------नोकरदार, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची मागणीआता मोबाईल फक्त बोलण्यापुरता राहिलेला नाही़ सर्वच क्षेत्रात मोबाईलचा अधिक वापर वाढला आहे़ अभ्यासक्रम, क्लासेस, वर्क फ्रॉम होम मुळे मोबाईल, टॅबला लॉकडाऊननंतर चांगली मागणी आहे़ १२ ते ६० हजार रूपयांपर्यंतचा टॅब आणि ६ हजार ते दीड लाखांपर्यंत स्मार्टफोनची विक्री होत आहे़ सोलापूर शहर व जिल्ह्यात मिळून ४०० ते ५०० मोबाईलचे दुकाने आहेत़ मागील दोन दिवसात स्मार्टफोन, टॅब व अॅक्सेसेरीजमधून अंदाजे ५० लाखांची उलाढाल झाल्याची माहिती ज्योती टेलिकॉमचे प्रमुख महेश चिंचोळी यांनी दिली.----------लॉकडाऊननंतर मोबाईल खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे़ आॅनलाइन शिक्षण प्रणाली व अडीच महिन्यानंतर दुकाने उघडल्याने ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला़ सुरूवातीला ग्राहक खरेदीपेक्षा चौकशी अधिक करीत आहेत. सध्या अॅक्सेसेरीजला अधिक मागणी आहे़ आॅनलाइन शिक्षण प्रणालीमुळे मोबाईल खरेदी वाढली आहे.- महेश चिंचोळी,ज्योती टेलिकॉम, सोलापूर------------मागील मार्केटचा विचार केला तर मोबाईल खरेदी ३० ते ४० टक्के वाढली आहे. लॉकडाऊननंतर दुकाने उघडल्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे़ स्मार्टफोन, टॅब खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे़ चार्जर, बॅटरी, कव्हर, हेडफोन अन्य मोबाईलसाठी लागणाºया साहित्यांचीही खरेदी होत आहे.- विजय गोस्की,स्वस्तिक इलेक्ट्रॉनिक्स, सोलापूर