राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी मोदी डोकेदुखी बनले : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:26 AM2019-04-01T10:26:59+5:302019-04-01T10:28:28+5:30

सत्तेत असताना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी  गैरव्यवहार केल्याने ही मंडळी आता मोदींच्या आॅपरेशन टेबलवर आहेत - प्रकाश आंबेडकर

Modi becomes headache for RSS: Prakash Ambedkar | राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी मोदी डोकेदुखी बनले : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी मोदी डोकेदुखी बनले : प्रकाश आंबेडकर

googlenewsNext
ठळक मुद्देपानसरे, गौरी लंकेश, दाभोळकर यासारख्या विचारवंतांची हत्या झाली. मात्र यामुळे देशातील विचारवंत संपणार नाहीत, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.काँग्रेसच्या नेत्यांवर सत्ता काळातील गैरव्यवहाराचा ठपका ठेवला. बाळासाहेब बंडगर -पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना धनगरी घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सत्कार केला

अक्कलकोट : मोदी हे ओबीसी असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची डोकेदुखी बनले आहेत. यामुळे मोदी हे संघाला धडा शिकविण्याच्या प्रयत्नात आहेत. पानसरे, गौरी लंकेश, दाभोळकर यासारख्या विचारवंतांची हत्या झाली. मात्र यामुळे देशातील विचारवंत संपणार नाहीत, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

सत्तेत असताना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी  गैरव्यवहार केल्याने ही मंडळी आता मोदींच्या आॅपरेशन टेबलवर आहेत. त्यामुळे भीतीपोटी मोदींच्या विरोधात बोलण्याची त्यांच्यामध्ये हिम्मत नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

अक्कलकोट येथील फत्तेसिंह चौकात आयोजित केलेल्या प्रचार सभेत आंबेडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आनंद चंदनशिवे,  रवी गायकवाड,  सिद्धार्थ बनसोडे,चंद्रशेखर मडिखांबे, समीर शेख, तौफिक शेख, शिवानंद हैबतपुरे महाराज, अण्णाराव पाटील, शिलामणी बनसोडे उपस्थित होते. यावेळी परमेश्वर गुमते, मल्लिनाथ पाटील, देवानंद अस्वले, गोपाळ बुरबुरे, देविदास नडगम, सोहानी सचिन, ओमकार धनश्री, चंद्रशेखर मडिखांबे उपस्थित होते.

मोदींच्या आॅपरेशन टेबलवर असल्याने काँग्रेसचे नेते घाबरतात..

  • -  दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर सत्ता काळातील गैरव्यवहाराचा ठपका ठेवला. 
  • - बाळासाहेब बंडगर -पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना धनगरी घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सत्कार केला. व्यासपीठावर अ‍ॅड़ अण्णाराव पाटील, माऊली हळणकर, राधाकृष्ण पाटील, श्रीशैल गायकवाड, सचिन फडतरे राजरत्न गावडे, मोहम्मद शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Modi becomes headache for RSS: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.