शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

मोदी सरकारने हमीभाव योजनेतही केली फसवणूक - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 12:13 PM

ऊस उत्पादकांची थकीत एफआरपी त्वरित देण्याची मागणी

ठळक मुद्देराज्यात गायीच्या दुधाचे तब्बल १ कोटी ५ लाख लिटरच्या आसपास संकलनकेंद्र सरकारने केवळ वीस टक्के एमएसपी म्हणजे हवीभावात वाढशेतकºयांचा उत्पादन खर्च हा २५ टक्क्यांवर

सोलापूर : मोदी सरकारनं मोठा गवगवा करून शेतकºयांसाठी जाहीर केलेला खरीप पिकांचा हमीभाव फसवा आहे. शेतकºयांचा उत्पादन खर्च हा २५ टक्क्यांवर पोहोचलेला असताना केंद्र सरकारने केवळ वीस टक्के एमएसपी म्हणजे हवीभावात वाढ केली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या या योजनेतही पुन्हा शेतकºयांची फसवणूक होणार आहे, अशी माहिती खा़ राजू शेट्टी यांनी सोलापूरात बोलताना दिली़ 

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी सरकार शेतकºयांच्या बाबतीत नेहमीच दुट्टपी भूमिका घेत असल्याचा आरोप करीत दिवसेंदिवस दुधाचे दर कमी होत चाललेले असताना ठोस भूमिका घेताना दिसत नाही. यामुळे दूध उत्पादकांना आपली जनावरे वाºयावर सोडून देण्याची वेळ आली आहे. शेजारच्या कर्नाटकात प्रतिलिटर ४ रुपये दिले जात आहेत. आंध्र, तेलंगणाचीही सकारात्मक भूमिका आहे. महाराष्टÑातील सरकार मात्र काहीच करायला तयार नाही याबद्दल संताप व्यक्त केला.

राज्यात गायीच्या दुधाचे तब्बल १ कोटी ५ लाख लिटरच्या आसपास संकलन होते. प्रत्यक्षात महिन्याला दीडशे कोटी लिटरची गरज आहे. शासनाने या पशुपालकांना मदत दिली तर सुरळीत होणार आहे, मात्र सरकारची शेतकºयांच्या बाबतीत मदत करण्याची मानसिकता नाही. दूध संघाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान दिले गेले, मात्र त्यांनी ते अन्यत्र वळवले आहे.

दूध उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करावेत ही आमची आग्रही मागणी आहे. याशिवाय ऊस उत्पादकांची थकीत एफआरपी २ हजार कोटी रुपये आहे तीही देण्यात यावी, अन्यथा १६ जुलैपासून राज्यभरातून दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा खा.शेट्टी यांनी दिला.

सरकारच्या लाडक्या मुंबईसाठी एक थेंबही दुधाचा पुरवठा होणार नाही दूध उत्पादक शेतकरी भले हे दूध वारीतल्या वारकºयांना, गोरगरिबांना देऊन त्यांचा दुवा घेईल पण स्वस्थ बसणार नाही, असेही शेट्टी यांनी सूचित केले. 

१६ जुलैपासून दूध बंद आंदोलनदुधाला हमीभाव मिळवून देणे हे सरकारचे काम आहे. मात्र त्यांना काहीच करायचे नाही. अन्य राज्यांतील सरकार दूध उत्पादकांच्या बाबतीत सकारात्मक असताना महाराष्टÑ शासन मात्र उदासीन धोरण अवलंबत आहे. सरकारला शांततेची भाषा कळत नाही म्हणून येत्या १६ जुलै २०१८ पासून दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली २ हजार कोटी रुपये थकबाकी तातडीने          द्यावी या मागणीसाठी दूध पुरवठा  बंद करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी          सोलापुरात पत्रकार परिषदेद्वारे दिला. 

दोन्ही बाजूने शेतकºयांचीच गोची- केंद्र सरकारने हमीभाव वाढवले असले तरी वाढीव भाव नेमका कुणी द्यायचा हाही मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केले असले तरी सरकार हमीभावाने शेतकºयांचा माल खरेदी करत नाही आणि बाजारपेठेतील व्यापारीही हमीभाव देत नाही. अशा स्थितीत शेतकºयांचीच गोची होते. शेतीमालाचे उत्पादन घेताना खर्चातही २० ते २५ टक्के वाढ झालेली आहे. आणि दरवाढही तेवढ्याच प्रमाणात झाली आहे. म्हणजे शेतकºयांच्या हाती काहीच नाही. मग त्यांनी करायचे काय? असा सवालही खा. शेट्टी यांनी सरकारला केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाBJPभाजपा