शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'मोदी सरकारच्या 'राष्ट्रवादा'मुळे देशाच्या फाळणीचा धोका!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 13:12 IST

सर्जिकल स्ट्राईकमधून राष्ट्रवाद पुढे आणला जात असला तरी यामुळे देशाच्या फाळणीचा धोका मोठा आहे, अशी भीती खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देसोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ खासदार कुमार केतकर सोलापूर दौºयावरलोकांचा असंतोष वाढत असल्याचे दिसल्यावर दिशाभूल करणारे असे नवे फंडे हे सरकार आणत आहे - केतकरसुरक्षेचा इतका गाजावाजा केला जातोय की यावरून भाजप नेत्यांचा इतिहास व भूगोल कच्चा दिसत आहे - केतकर

सोलापूर : मागील निवडणुकीत गुजरात मॉडेल दाखवून मोदी सरकार सत्तेवर आले, पण पाच वर्षांत यश न आल्याने आता राष्ट्रवाद पुढे करून जनतेला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. भाजप नेत्यांचा इतिहास व भूगोल कच्चा असल्याचे दिसत आहे. सर्जिकल स्ट्राईकमधून राष्ट्रवाद पुढे आणला जात असला तरी यामुळे देशाच्या फाळणीचा धोका मोठा आहे, अशी भीती खासदार कुमार केतकर व्यक्त केली. 

सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ खासदार कुमार केतकर सोलापूर दौऱ्यावर आले होते. काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. सन २0१४ मध्ये गुजरात मॉडेल समोर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता हातात घेतली, पण पाच वर्षांतील अपयश झाकण्यासाठी विविध प्रयोग केले. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना इंधनाचे दर काय होते़ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरवरून इंधनाचे भाव ठरतात. डॉलर खाली आला तरी देशात इंधनाचे दर उतरले नाहीत. याबाबत विचारणा केली तर सर्जिकल स्ट्राईकचे कारण पुढे केले. सुरक्षेचा इतका गाजावाजा केला जातोय की यावरून भाजप नेत्यांचा इतिहास व भूगोल कच्चा दिसत आहे. 

सर्जिकल स्ट्राईक यापूर्वीही झाले आहेत, असे खासदार केतकर यांनी सांगितले. यातून काय मिळाले, पाकिस्तानची फाळणी झाली, हा झाला इतिहास. त्यानंतर बांगलादेश निर्माण झाला, हे झाले भूगोल. काश्मीरसाठी कलम ३७0 रद्द करण्याची भाषा केली जातेय. यातून काय होईल. हे कलम काय फक्त काश्मीरसाठी नाही तर इतर राज्यांसाठी लागू आहे. हे कलम रद्द झाले तर देशाचे तुकडे पडतील. केवळ आपले अपयश झाकण्यासाठी मोदी सरकार अशी नवीन प्रकरणे समोर आणत आहे. सर्जिकल स्ट्राईकबाबत वाद निर्माण झाल्यावर लगेच क्षेपणास्त्र सोडण्यात आले. नीरव मोदी, विजय मल्ल्याचे विषय आल्यावर तलाकचे प्रकरण आणले. लोकांचा असंतोष वाढत असल्याचे दिसल्यावर दिशाभूल करणारे असे नवे फंडे हे सरकार आणत आहे, असा आरोप केतकर यांनी  केला.

 यावेळी माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, राजन कामत आदी उपस्थित होते. 

उत्पन्न दुप्पट झाले का?सन २0२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी सरकारने घोषणा केली होती. उत्पन्नाचे सोडाच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला नाही, कर्ज माफ केले नाही. याउलट चार वर्षांत उद्योगपतींचे ६ लाख कोटींचे कर्ज माफ केल्याचा आरोप खासदार केतकर यांनी केला. दहा वर्षांत औद्योगिक कर्जमाफीची आकडेवारी ८ कोटींची आहे. त्यात मोदी सरकारने मोठा टप्पा गाठला. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019