शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

मोहोळ विधानसभा; राखीव असूनही इच्छुकांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:01 PM

राजकीय समीकरण; जागा शिवसेना की भाजपला यावर बरीच गणितं अवलंबून

ठळक मुद्दे राखीव असणाºया मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, भाजप व वंचितसह सर्वच पक्षातून स्थानिक उमेदवारांसह बाहेरून येणाºयांची  संख्या ढीगभरकोणत्याच पक्षाचा कोणताच उमेदवार अद्याप निश्चित नसल्याने प्रत्येक जण एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यातच धन्यता मानत आहेत

अशोक कांबळे

मोहोळ : राज्यासह जिल्ह्यात येऊ घातलेल्या २०१९ च्या विधानसभेचे वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक बड्या-बड्या मंडळींनी सेना-भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. अशा परिस्थितीत मोहोळ विधानसभा मतदारसंघात मात्र आजही शांतताच दिसून येत आहे.

जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात ज्या-त्या पक्षाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व राजकीय मंडळी कामाला लागली आहेत. मात्र राखीव असणाºया मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, भाजप व वंचितसह सर्वच पक्षातून स्थानिक उमेदवारांसह बाहेरून येणाºयांची  संख्या जरी ढीगभर असली तरी कोणत्याच पक्षाचा कोणताच उमेदवार अद्याप निश्चित नसल्याने प्रत्येक जण एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यातच धन्यता मानत आहेत. परंतु गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या मतदारसंघाला आता तरी चांगला स्थानिक आमदार मिळणार का? का पुन्हा ठरल्याप्रमाणे बाहेरचाच उमेदवार येणार? अशी चर्चा गावागावात कट्ट्यावर बसणाºया ज्येष्ठ नागरिकांसह युवा मतदारातून रंगत दिसत आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार रमेश कदम यांना ६२ हजार १२० मते मिळाली होती. भाजपचे संजय क्षीरसागर यांना ५३ हजार ७५३ मते मिळाली होती. शिवसेनेचे मनोज शेजवाल यांना ४२ हजार ४७८ मते मिळाली आणि माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना १२०१४ मते मिळाली होती. यात ८ हजार ३६७ मतांनी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम विजयी झाले होते.परंतु विद्यमान आमदार रमेश कदम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या प्रकरणांमध्ये गेली चार वर्षे कारागृहात आहेत. याची उणीव राष्ट्रवादीला चांगलीच जाणवली आहे. अशा कठीण परिस्थितीत मागील दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या गटाने राष्ट्रवादीशी फारकत घेतली. विजयराज डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात भीमा परिवाराचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोहोळ तालुका पंचायत समिती राष्ट्रवादीच्या विरोधात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे, हे मान्यच करावे लागणार आहे. 

दुसरीकडे सेना-भाजपची अवस्था यापेक्षाही वेगळी आहे. तालुक्यात शिवसेना व भाजपमधील गटबाजी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ती कमी होण्याऐवजी वाढतच गेली आहे. या गटबाजीचाच फायदा राष्ट्रवादीला प्रत्येक वेळी होत आला आहे. या सर्व गोष्टींची जाणीव असताना देखील सेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अद्याप तरी ही गटबाजी संपविण्यात यश आलेले दिसत नाही. या येणाºया विधानसभेत तरी ही गटबाजी थांबणार का? असा प्रश्न शिवसैनिकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

 राष्ट्रवादीच्या माध्यमातून आजमितीला भाजपचे माजी खासदार शरद बनसोडे हे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते राजन पाटलांपर्यंत संपर्कात आहेत. त्याचबरोबर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक निर्मला बावीकर, पुण्याचे नगरसेवक सुभाष जगताप, कॉन्टॅÑक्टर राजाभाऊ खरे, निवृत्त सनदी अधिकारी सुनील रावडे यांनी वरच्या पातळीवरून प्रयत्न चालवले आहेत. तर पूर्वीपासून सेनेच्या वाट्याला असणाºया मतदारसंघातील जागेसाठी भाजपमधून सेनेत गेलेले नागनाथ क्षीरसागर, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज शेजवाल, सेनेचे तालुका उपप्रमुख नागेश व्हनकळसे, अनगरचे उद्योजक अर्जुनराव वाघमारे यांनी उमेदवारी मागितली आहे. तर भाजपमधून गत पंचवार्षिकला केवळ ८ हजार मतांनी पराभूत झालेले संजय क्षीरसागर, राज्यसभेचे खासदार अमर साबळे तर काँग्रेस आयच्या माध्यमातून काँग्रेसच्या मागासवर्गीय युवक सेलचे गौरव खरातही तयारीत आहेत. वंचित आघाडीमधून अ‍ॅड़ विनोद कांबळे, धनंजय आवारे प्रयत्नात आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरmohol-acमोहोलvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण