सोमवारी दिवसभर जुना अडत बाजार येथे भाजीपाला खरेदीसाठी तालुक्यातील नागरिकांनी एकच गर्दी केली. यामध्ये अनेकांनी तोंडाला ना मास्क, ना शारीरिक अंतर याचे काहीच भान न ठेवता. मोकाटपणे वावरताना दिसून आले. यामुळे शहर व तालुक्यात कोरोना रुग्णवाढीला चालना मिळत आहे. आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवून कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारचे आदेश व सूचना दिल्या आहेत. याकडे नगरपालिका, पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
चौकट:-
अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असलीतरी अशीच मोकाट स्थिती राहिल्यास, येत्या काही दिवसात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना लस देणे व उपचार करणे याबाबतीत सुट्टीच्या दिवशी तारांबळ उडाली. दोन दिवसात सुटीच्या दिवशी लस नसल्याने देणे बंद केले आहे.
२९अक्कलकोट-बाजार
अक्कलकोट येथील आठवडा भाजीपाला बाजारात नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच तोंडाला मास्क न लावता एक ७० वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती भाजी विक्री करताना दिसत आहे.