उत्तर सोलापूर : आरोग्य सेवा घराघरापर्यंत पोहोच करतानाच पाॅझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना धीर देण्याचे आरोग्यदूताचे काम करीत आहेत पाकणी- शिवणीच्या आरोग्य सेविका मोनिका जाधव. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या गावात पाकणीचा समावेश आहे. कोरोनाबाधित झालेल्यांना धीर देत कुटुंबातील सदस्यांना आधार देत जनजागृतीमुळे अनेकांना कोरोनापासून दूर ठेवले. रॅपिड व आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी लोक तयार होत नव्हते. मात्र, प्रबोधनाच्या माध्यमातून मोनिका जाधव यांनी तपासणीसाठी अनेकांना तयार केले. यामुळेच १४४६ लोकांची तपासणी झाली आहे. यावर्षी पाकणीत २५ मार्च रोजी पाकणीत पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर त्यांनी कामाचा वेग वाढविला. पाकणीत आतापर्यंत ११३ व शिवणीत ३९ कोरोनाबाधित झाले आहेत. गावात लसीकरणाचे काम प्रत्येक कुटुंबातील बालकांना देतानाच कोरोनाचा भार त्यांनी यशस्वी उचलला. कोरोनाबाधित गंभीर झालेल्यांना उपचाराची सोय होण्यासाठीही आरोग्य सेविका जाधव यांनी मदत केली आहे.
---
फोटो-