वारवार यमाईदेवी मंदिर परिसरात अशा घटना घडत असल्याने याबाबत ग्रामस्थांकडून वीजमंडळ व वनविभागास निवदेन देण्यात आले. माळशिरस तालुक्यातील महाळुंग या गावात श्री यमाईदेवी प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. येथे वर्षातून दोन ते तीन वेळा मोठी यात्रा भरते महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून देवीच्या दर्शनासाठी भाविक दरवर्षी लाखो संख्येने उपस्थित असतात. पुरातून मंदिर असल्यामुळे येथे माकडांची संख्याही जास्त आहे. मंदिर परिसरात विद्युत खांब असल्याने माकडे खाब व तारेवर खेळत असतात. अनेकदा ते शॉक लागून मरतात. गेले अनेक वर्षे सातत्याने विद्युत प्रवाहामुळे अनेक माकडे मृत्यू पावली आहेत.
रविवार सकाळी १० वाजता यमाई देवी मंदिर परिसरात माकडाची लहान पिल्ले खेळत असताना एका माकड खांबावर चढले आणि तेथेच चिटकून शॉक लागून मृत पावले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाळूंगचे सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे व त्यांच्या मित्रांनी वीजमंडळ तसेच वनविभागात या घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानुसार वनविभागतील अधिकारी येऊन माकडचे शव घेऊन गेले. याबाबतचे निवेदन देताना राजू शिंदे, रमेश देवकर, माउली भोसले, दादा भोसले, संजय भोसले, सोमनाथ लाटे, धनंजय कुरडे, गोविंद भोसले आदी उपस्थित होते.
----यमाईदेवी मंदिर व आसपास परिसरातील विद्युत तारांना कोटिंग करण्याचा निधी उपलब्ध झालेला आहे. मात्र अद्याप कार्यवाही नाही. यामुळे माकडे मारत आहे. लवकर अंमलबजावणी करावी.
- राजू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, महाळूंग