सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीसमोरील बागेत एका भटक्या वानराने मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उच्छाद मांडल्यामुळे वनविभाग व प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाºयांची त्याला पकडण्यासाठी धावपळ उडाली.
दरम्यान, शनिवार ४ आॅगस्ट रोजी महापालिकेच्या इमारतीसमोरील एका भटक्या वानराला जेरबंद केल्याची घटना ताजी असताना मंगळवारी आणखी एका वानराने महापालिकेच्या इमारतीसमोर उच्छाद मांडला. इंद्रभुवन बागेत या वानराने इकडून तिकडे उड्या मारण्यास सुरूवात केल्यानंतर महापालिकेत सकाळी आलेल्या नागरिकांनी धावपळ उडाली़ महापालिका प्रशासनाने याबाबत प्राणीसंग्रहालयाचे वैद्यकीय अधिकारी शुभांगी सादने यांना कळविले तर वनविभागाच्या पथकामार्फत त्यांनी इंद्रभुवन बागेत धाव घेतली़ पथकातील कर्मचारी पाहुन वानराने चिंचेच्या झाडावर उंचठिकाणी बसकन मारली़ गनव्दारे भुलीचे इजेक्शन देऊन त्या वानराला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.