रुग्णसंख्या कमी झाल्याने डबे वाटप केले बंद
बार्शी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देण्यासाठी विविध व्यक्ती व संघटना पुढे आल्या. प्रत्येकाने आपल्या परीने ही मदत केली. आ़मदार राजेंद्र राऊत मित्रमंडळ व बार्शी मर्चंट असोसिएशनच्या वतीने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुरू केलेली मोफत डबे देण्याची योजना रुग्णसंख्या कमी झाल्याने बंद करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दीड महिन्यात ७५,४१५ डबे वितरित करण्यात आले.
माऊली केटरर्सचे सोमनाथ पवार यांच्या माध्यमातून ही योजना सुरू झाली. रुग्ण वाढले तेव्हा एका दिवशीचा आकडा हा सातशेपर्यंत पोहोचला होता. रुग्णासोबत बंदोबस्तासाठी बार्शीत आलेल्या पोलिसांनाही हा डबा देण्यात आला. चपाती, सुकी भाजी, वरण व भात असा मेनू होता. तर नाष्ट्यासाठी पुरी भाजी, उपीट, शिरा आदी अन्नपदार्थ दिले जात होते. या योजनेमध्ये योगदान देणाऱ्या आचारी सोमनाथ पवार व व्यापारी बांधव यांचा बार्शी मर्चंट असोसिएशनच्यावतीने सोमवारी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून सर्वानी जेवणाचा आस्वाद घेतला व योजना थांबविण्यात आली.
यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कथले, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव महेश करळे, माजी अध्यक्ष दामोदर काळदाते, संचालक मल्लिनाथ गाडवे, अनिल गायकवाड, शिवशंकर बगले, भारत कोटेचा, संतोष बोराडे, भरतेश गांधी, अरुण मुंढे आदी उपस्थित होते.
----
सर्वांच्या योगदानातून जमले ३० लाख
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हॉस्पिटलमध्ये बेड मिळणेदेखील मुश्किल झाले होते. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी हॉस्पिटल आवारात नातेवाईक देखील येत नव्हते. बार्शीसह तेरा तालुक्यांतील रुग्ण बार्शीत उपचार घेत होते़ त्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचा विचार आ़मदार राजेंद्र राऊत यांनी मांडला होता. त्याला बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती व बाजारातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त लोकवर्गणी जमा झाली़. त्यामध्ये बार्शी मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता.
---१५बार्शी-भोजन
===Photopath===
140621\img_20210614_141941.jpg~140621\img-20210614-wa0013.jpg
===Caption===
आमदार राजेंद्र राऊत यांनी स्वयंपाक घराला भेट दिली तेव्हाचा फोटो~आमदार राऊत यांनी स्वयंपाक घराला भेट दिली तेव्हाच फोटो