शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

रमजान महिन्यात पाणीदार फळांना मागणी जास्त

By appasaheb.patil | Published: May 16, 2019 12:54 PM

रमजान महिना सुरू झाल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली.

ठळक मुद्देरमजानचा पवित्र महिना सुरू आहे़ रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचा वापर वाढला यंदा आवक कमी असली तरी म्हणावे तसे भाव वाढले नाहीतसोलापूर जिल्ह्यातील विविध भागांसह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून फळे विक्रीसाठी सोलापुरात येत आहेत.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : एकीकडे रखरखते ऊन... अन् दुसरीकडे रमजानचे रोजे. दिवसभर उपासीपोटी दैनंदिन कामे मार्गी लावण्यासाठी मुस्लीम बांधव फळांचा आस्वाद घेऊन रोजे सोडतात. सध्या पवित्र रमजान महिन्यात पाणीदार फळांना विशेष मागणी आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात कमी प्रमाणात फळे दाखल होत असल्याने फळांच्या भावात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ याशिवाय मागणीअभावी डाळिंब, पेरूच्या भावात घट झाल्याची माहिती फळविक्रेते रिजवान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

रमजान महिना सुरू झाल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली आहे़ यंदाही रमजानच्या पार्श्वभूमीवर मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी व्यापाºयांची विविध फळांच्या उपलब्धतेसाठी धावपळ होत आहे़ दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन आणि आवक घटल्याने बहुतांश फळांचे भाव यंदा तेजीत आहेत. सामान्य ग्राहक रमजानमध्ये स्वस्तातील केळीला जास्त पसंती देत असल्याची माहिती फळविक्रेते रिजवान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ विविध फळबाजारातील व्यापाºयांनी केळी खरेदीवर भर दिला आहे. परप्रांतातून अन् विदेशातून मोठ्या प्रमाणावर फळे आली आहेत. 

उत्पादकांमध्ये समाधान...- यंदा पाणीटंचाई आणि अति तापमान यामुळे उन्हाळ्यात केळीच्या बागा जगविणे मुश्कील होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे शेतकºयांनी तेजीचा फायदा उचलून केळीबागा लवकर खाली करण्यावर लक्ष केंद्रित केले़ रमजान महिन्यात केळीला मागणी जास्त आहे़ पौष्टीक व स्वस्त असल्याने रोजा (उपवास) सोडताना सर्रास मुस्लीम बांधव केळीचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे़ संपूर्ण रमजान महिन्यात केळीचे भाव तेजीत राहण्याची शक्यता असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले़ 

पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांना मागणी- मुस्लीम धर्मीयांचा पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू झाला आहे़ या काळात मुस्लीम बांधवात पहाटेपासून ठेवण्यात आलेले रोजे (उपवास) संध्याकाळी सोडण्याची प्रथा आहे. रोजा सोडताना सर्वसाधारणपणे जड पदार्थ न खाता ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे ती फळे खाण्याची एक पद्धत प्रचलित आहे. दिवसभर पाण्याचा एक थेंब न पिण्याचाही नियम रोजा काळात पाळला जातो. त्यामुळे संध्याकाळी रोजा सोडताना केळी, कलिंगड, पपई, डाळिंब, अननस, टरबूज या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांना मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले.

पाणीदार फळांची आवक निम्म्यावर- पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील काही शेतकरी रमजान महिन्यात पाणीदार फळे बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न करतात़ कारण या काळात त्यांच्या मालाला चांगला भाव देखील मिळतो़ दुष्काळामुळे आवक कमी असल्यामुळे फळांना चांगला भाव मिळतो़ परिणामी शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होते़ यंदा या फळांवर पाणीटंचाईचे संकट असले तरी बाजारात फळांची आवक चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे़ रमजान काळात येणाºया या पाणीदार फळांची आवक निम्म्यावर आली असून, त्यांचे दर वाढत असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले़

रमजानचा पवित्र महिना सुरू आहे़ रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचा वापर वाढला आहे़ यंदा आवक कमी असली तरी म्हणावे तसे भाव वाढले नाहीत़ शहरातील विविध मशिदीमधील मुस्लीम बांधवांना रोजा सोडण्यासाठी सामाजिक संस्था, संघटनांकडून फळांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे़ सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांसह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून फळे विक्रीसाठी सोलापुरात येत आहेत.- सुलतान शेखफळविक्रेता, सोलापूर

फळ                          घाऊक    किरकोळ (दर प्रति किलो रुपयात)सफरचंद                      ५५        १५० ते २००पेरू                              ४६        १००मोसंबी                          १६        ५० ते ६०पपई                            २०        ४५चिकू                             ३५        ६५संत्री                                २४        ५० ते ६०केळी (डझन)                    २०        ३० ते ३५कलिंगड (नग)                १५        ३० ते ३५पपई (नग)                     १० ते १२        १० 

टॅग्स :SolapurसोलापूरfruitsफळेRamadanरमजानAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार