हा माेर्चा माणिक पेठ येथून निघून शहरातील विविध मार्गावरून एसटी स्टॅंडवर नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन दिले. त्यानंतर सुनील खवळे यांनी समाजबांधवांना प्रबोधन केले. यावेळी बबन जोगदंड, विजय पोटफोडे, सुरेश पाटोळे, किरण डोलारे, बंडू गवळी, नाना पाटोळे यांनीही या घटनेचा निषेध केला. या मोर्चाला मराठा महासंघ, वीर शैव कक्कया फाउंडेशन, शिव बसव, आंबेडकर प्रतिष्ठान व विविध संघटनांनी पाठिंबा दिला.
या माेर्चात रतन शितोळे, श्रीपाद खवळे, राहुल क्षीरसागर, अमोल मोरे, मंजन नाईकनवरे, दत्ता वाघमारे, अभिमान वाघमारे, महिपती क्षीरसागर, दत्ता केंदळे, विकी गायकवाड, संतोष पारखे, बानू देडे, फुलाजी कांबळे, अरविंद लोखंडे, तानाजी देडे, मंगलबाई कांबळे, अनिता देडे, कांचन देडे, बाळू बनसोडे, ताराबाई क्षीरसागर, वंदना वाघमारे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाला होता.
फोटो
१४अक्कलकोट मोर्चा
ओळी
नांदेड येथील अत्याचार घटनेचा निषेध करून नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देताना बबन जोगदंड, सुनील खवळे, ताराबाई क्षीरसागर, कांचन देडे, पुतळाबाई क्षीरसागर आदी.