पंढरपूर : नागरिकांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र पंढरपुरातील अनेक प्रतिष्ठित लोक याकडे दुर्लक्ष करत मॉर्निंग वॉकसाठी निघत आहेत. सोमवारी पहाटेची शुद्ध हवा खायला गेलेल्या ३० लोकांना पोलीस ठाण्याची हवा खावी लागली आहे. यामुळे पकडलेले प्रतिष्ठित नागरिक आम्हाला जाऊद्याना घरी औषधाची वेळ झाली म्हणून पोलिसांना तासभर विनंती करत होतो.
देशाच्या पंतप्रधानांपासून ते शासकीय कर्मचाऱ्यापर्यंत सर्वजण नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्त्यावर फिरू नये असे आव्हान करत आहेत. महाराष्ट्र राज्यातील कोरोना ग्रस्त चा आकडा २०० पार झाला आहे. तरीही पंढरपूरकर मात्र याबाबत गांभीर्याने विचार करत नाहीत. कोरोना पासून बचाव होण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांकडे पंढरपूरकर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. मुक्तपणे दुचाकी-चारचाकी तून फिरणे. मुक्तपणे दुचाकी-चारचाकी तून फिरणे. तसेच पहाटे मॉर्निंग वॉक साठी जात आहे. यामुळे उपविभागीय डॉ सागर कवडे यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक गणेश निंबाळकर, पो स फौ. अभिमन्यू डोंगरे, पो कॉ. संदीप पाटील, सचिन भोसले यांनी आज पहाटे इसबावी, लिंक रोड, ठाकरे चौक आदी भागातून वॉकसाठी गेलेल्या लोकांना ताब्यात घेतले.
त्यांना पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले. त्याठिकाणी बराच वेळ बसवल्यानंतर संबंधित लोकांनी आम्हाला औषध घ्यायचा घरी जाऊ द्या. पुन्हा बाहेर फिरणार नाही अशी विनंती केली. या सर्व लोकांवर शासकीय आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली.
कोट :::::::जगभरात करोना रोगाच्या आपत्तीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लॉक डाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तरीही काही नागरिक मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने संचारबंदी चे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ३० जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.. सर्व प्रशासन यंत्रणा करोना रोगाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये;कारण करोना हा संसर्गजन्य रोग आहे. सर्व नागरिकांनी लॉक डाऊन व संचारबंदी चे पालन केले पाहिजे.- डॉ. सागर कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर
या लोकांवर कारवाई
सतीश बाळू मगर, विशाल कालिदास भोसले, कोंडीबा रामचंद्र वागडे, विनायक रामचंद्र कवठाळकर, संपत निवृत्ती सोनवणे, चंद्रकांत धनाजी देशमुख, सुभाष पांडुरंग यलमार, सुनिल उत्तमराव पाटील, कैलास जगन्नाथ घोडके, विजय गुलाब लोखंडे, भिमराव दशरथ देशमुख, श्रीकांत लक्ष्मण राजगुरू, ओंकार बाळासाहेब भिसे, दिगंबर पांडुरंग चोरमोले, दादा सुखदेव खरात, अल्लीसाहेब गाफुर इनामदार, दिगंबर दादा पवार, दत्तात्रय शिवा पाटील, रमेश हरिबा दिवटे, जयसिंग हरी सातपुते, मल्लाप्पा भीमराव मासाळ, देविदास जगन्नाथ लोखंडे, अतिश दिलीप बनसोडे, हरी बाबू रोकडे, पंडित नारायण डोके, भारत शिवदास भींगे, संतोष दिगंबर गोरे सुभाष गोविंद माने शरीफ मेहबूब खान या सर्वांनी शासकीय आदेशाचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.