ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये सुरक्षा विषयक जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी विशेष अभियान सुरू केले आहे. वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयहिंद शुगर, आचेगाव आणि गोकुळ शुगर,धोत्री या साखर कारखान्यांच्या ऊस वाहतूक चालकांच्या बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी जय हिंद शुगर्सचे व्हा. चेअरमन विक्रमसिंह पाटील, गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे, कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, कार्तिक पाटील, शेतकी अधिकारी क्षीरसागर, राजेंद्र जेऊरे, वीरभद्र सुतार, दत्तात्रय तोरणे यांच्यासह ऊसवाहतूक चालक उपस्थित होते.
सूर्यकांत कोकणे यांनी उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे होणारे अपघात आणि चालकांची बेफिकिरी यावर प्रबोधन केले. सहा. पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनीही मार्गदर्शन केले.
फोटो
०६साऊत सोलापूर
फोटो ओळी
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवताना वाहतूक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे. त्याप्रसंगी सहा. पोलीस निरीक्षक अतुल भोसले, विक्रमसिंह पाटील, राजेंद्र जेऊरे आदी.