वाळूजमधील ज्ञानोबा गोपीनाथ साठे (वय ६०) यांचा ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला.
साठे यांनी आयुष्यभर मोलमजुरी करून मुलाला शिक्षण दिले. कोरडवाहू शेती असल्याने त्यात उत्पन्न नसल्यामुळे रत्नागिरी येथे काम केले. साठे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. नागनाथ अभिमन्यू कादे (६२) यांचाही मृत्यू कोरोनामुळेच झाला. ते गेल्या २५ वर्षांपासून मोहोळ येथील एका पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. अल्पभूधारक असल्याने कुटुंबांचा गाडा हाकताना अनेक अडचणी यायच्या परिणामी मुलांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यांच्या पश्चास पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
गोवर्धन पंढरी मोटे (वय ७०) यांचे सर्पदंशाचे निधन झाले. मोटे यांनी आयुष्यभर सालगडी म्हणून काम केले. काबाडकष्ट करून दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. एक मुलगा विदर्भ कोकण या बँकेत कामाला आहे. दोन एकर शेतीत एक बोअर मारून बागायत क्षेत्र केले, जर्सी गायींना वैरण काढताना त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
नेताजी भीमराव पाटील (वय ६४) यांचे हृदयविकाराने निधन झाले. नेताजी पाटील हे विविध कार्यकारी सोसायटीतून सचिव म्हणून निवृत्त झाले. मुलांचे शिक्षणासाठी त्यांनी मदत केली. मात्र अचानक त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, चार मुली जावई व नातवडे असा परिवार आहे.
रतनबाई लक्ष्मण मोटे (वय ६५) यांचे रक्तदाबामुळे निधन झाले. चार एकर शेतीत दिरांसह सर्वांचे भागत नसल्याने ते पती-पत्नी सोलापर येथे कामाला गेले. तेथे जम बसविला. मुलांना किराणा दुकान सुरू करून दिले. त्यानंतर पुन्हा गावी येऊन पुन्हा १० एकर जमीन विकत घेतली. द्राक्षे बाग लावली, सर्व सुरळीत असताना अचानक ही घटना घडल्याने त्यांचे कुटुंबीय दु:खात आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
कर्तेकरवते गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर
वरील सर्व जण घरातील कर्तेकरवते होते. मात्र त्यांचा विविध कारणामुळे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्वसामान्यांवर अशी वेळ येऊ नये, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
फोटो.
१८ नेताजी पाटील
१८ रतनबाई मोटे
१८ गोवर्धन मोटे