सुनील सावंत म्हणाले, सोमवारी सकाळी बाजार समितीमध्ये सभापती शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, संचालक देवा ढेरे, सचिव सुनील शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यात सभापतींनी वाहन प्रवेश फी बंद करण्याबाबत संचालक मंडळ सभेपुढे हा विषय घेऊन शासनाच्या नियमानुसार योग्य तो निर्णय घेऊ. तसेच वाहन प्रवेश फी गोळा करण्यासाठी नेमलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यामुळे बाजार समितीची बदनामी होत असल्याने त्याला कामावर न येण्याबाबत कारवाई करावी, याबाबत सभापतींनी सचिवांना पत्राची प्रत दिली. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. जर याबाबत कुठलीही कार्यवाही न केल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे सावंत यांनी सांगितले.
यावेळी आंदोलनकर्ते शिवसेनेचे राजेंद्र काळे, काँग्रेसचे फारूक बेग, औदुंबर उबाळे, अलीम पठाण, हरिभाऊ मोरे, अस्लम नालबंद, शरद वाडेकर, मुनाज शेख, संभाजी गायकवाड, धनंजय शिंदे, श्रीकांत ढवळे, अकबर बेग, निसार शेख, मैनुद्दीन बेग, अलीम शेख, माजीद शेख, रमेश हवालदार उपस्थित होते.
फोटो १५
कामगीर
ओळी
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाहन प्रवेश फी बंद करण्याच्या मागणीसाठी सभापती शिवाजी बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप व आंदोलनकर्ते सुनील सावंत चर्चा करताना.