सोलापूर : सोलापूर महानगरपालिका परिवहन कर्मचा-यांचे मागील जुलै २०१७ ते मे २०१८ पर्यंतचे थकीत व चालू मार्च ते जून २०१९ या कालावधीचे वेतन परिवहन विभागाकडे प्रलंबित आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी, पत्रव्यवहार, निवेदने देवून सुध्दा महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापक यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने आज नाईलाजाने परविहन' कर्मचा-यांना आज काम बंद आंदोलन करित प्रशासन आणि शासनाच्या विरोधात भीक मांगो' आंदोलन करित असल्याचे मत शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
एकंदरित पाहता परिवहन कर्मचा-यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचा-यांच्या कुटुंबियांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच काही कर्मचा-यांच्या मुलांनी उपाशीपोटी आत्महत्या केलेली असून एखाद्या कामगाराच्या घरी मयत झाली तर त्याला सावकाराच्या दारात उभे राहून व्याजाने पैसे काढूनच अंत्यविधीचा कार्यक्रम करावा लागत आहे ही अत्यंत शरमेची बाब असून संबंधित परिवहन व्यवस्थापक, कार्यालयीन अधिक्षक,तसेच महापालिका आयुक्तांना वारंवार सांगून कोणताही उपयोग होत नसल्यानेच आजपासून काम बंद आंदोलन करीत हे भीक मांगो आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले असल्याची मतं शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी यावेळी व्यक्त केले.
आज भीक मांगो आंदोलन करून यातून जमा झालेले पैसे हे प्रशासन आणि शासनाला प्रदान करण्यात येणार आहे. सदरच्या आंदोलनात शहर कार्याध्यक्ष खालीद मनियार, उपप्रमुख मुश्ताक शेतसंधी, नवनाथ साळुखे, संभाजी व्हनमारे, शब्बीर नदाफ, सचिन वेणेगुरकर, मुदस्सर हुंडेकरी, अकील शेख, जाबीर सगरी, प्रणव शेंडे, इब्राहिम जमादार, अभिजित कुलकर्णी, इम्रान शेख, समस्त परिवहन कर्मचारी आदी उपस्थित होते.