रयत क्रांती संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन होत आहे. यावेळी प्रा. पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेत राज्यात मराठा आरक्षण लागू केले. परंतु महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले म्हणून न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. या निर्णयाच्याविरुद्ध आम्ही आंदोलन करीत आहोत. मराठा समाजाला शैक्षणीक व नोकरीमध्ये, आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणे गरजेचे आहे.
रयत क्रांती संघटनेच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशी आग्रही भूमिका जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. पाटील यांनी मांडली. यावेळी विश्वजित पाटील, ऋषिकेष पाटील, दिनेश मेटे पाटील, यशराज पाटील, दिग्विजय फंड, मधुरा पाटील आदी सहभागी झाले होते.
-----