यावेळी शेतकऱ्यांनी तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडावे यासाठी आपली कैफियत मांडली. यादरम्यान विद्युत वितरण महामंडळाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. खा. निंबाळकर यांनी शेतकरी बांधवांसमोर तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडून घ्या, तसेच फक्त चालू एकच बिल शेतकरी भरतील आणि मागील थकबाकीची रक्कम माफ व्हावी यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन, असे सांगितले.
यानंतर नवनिर्वाचित ३६ ग्रामपंचायत सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे उपस्थित होते. यावेळी सरपंचांनी खासदार निधीतून आपापल्या गावात वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचे निवेदन खा. निंबाळकर यांना दिले. यावेळी जि. प. सदस्या सवितादेवी राजेभोसले, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, विस्तारक भगवान गिरी गोसावी, अफसर जाधव, मोहन शिंदे, सरचिटणीस काकासाहेब सरडे, अमरजीत साळुंखे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, सचिन राऊत, दादासाहेब देवकर, अभिजित मुरूमकर, मच्छिंद्र हाके, संभाजी शिंदे, दत्तात्रय पोटे, तालुका चिटणीस अजिनाथ सुरवसे, अशोक ढेरे, किरण वाळुंजकर, तालुका प्रसिद्धप्रमुख जयंत काळे पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष भाग्यश्री कुलकर्णी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजश्री खाडे, उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब होसिंग, व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष लखन ठोंबरे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अशोक मोरे, भटके विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष लखन चिरके आदी उपस्थित होते.
---१५करमाळा-निंबाळकर
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विकास निधीची मागणी निवेदनाद्वारे करताना भाजपचे गणेश चिवटे व सरपंच पदाधिकारी.
----