शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, एका बाजूला सरकारने अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही, असे सांगितले तर दुसरीकडे महावितरण सक्तीने वीज कनेक्शन तोडत आहे. लाकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करावे. थकीत बिलात हप्त्यामध्ये भरण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मंडळ अधिकारी इंगोलेसह महावितरणचे अधिकारी संजयकुमार म्हेत्रे यांना निवेदन दिले. त्यानंतर अधिकाऱ्याने तोडलेले सर्व कनेक्शन जोडून देऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. या आंदोलनाला लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष राहुल देडे, भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी पाठिंबा दिला.
याप्रसंगी अमोल हिप्परगे, के. बी. पाटील, दत्तात्रय मुनाळे, किशोर सिद्धे, संतोष अंबड, रत्नशील जैनजांगडे, मनोज जाधव, सागर माने, मारुती माने, रुद्रमुनी स्वामी, विजय मठ, सिद्धराम इमडे, खय्युम जमादार, अमोल गुरव, अविनाश कदरगे, वजीर जमादार, महेश कुलकर्णी, प्रकाश पाटील, सचिन खडके, बसवराज म्हेत्रे, गोपाळ कुंभार, आंदप्पा म्हेत्रे, सौदागर खोडवे, मंगेश मोरे, अशपाक आगसापुरे, सोमनाथ बबलाद, नितीन निंबाळकर, रत्नाकर गायकवाड, इरणा भरमशेट्टी उपस्थित होते. सहा. पोलीस निरीक्षक नाळे, देवेंद्र राठोड, धनराज शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
महावितरणने आश्वासन पाळले
महावितरणने थकीत वीजबिल वसुलीसाठी सरसकट वीज कनेक्शन बंद करण्याची मोहीम सुरू केली. या विरोधात शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. तेव्हा अधिकाऱ्यांनी वीजजोडणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सायंकाळपर्यंत सर्व बंद केलेला वीजपुरवठा पूर्ववत करून आश्वासन पाळले.
फोटो
१९अक्कलकोट-महावितरण आंदोलन
ओळी
अक्कलकोट येथील महावितरण कार्यालयासमोर वीजतोडणीविरोधात आंदोलन करताना नरेंद्र पाटील, अमोल हिप्परगे, महेश कुलकर्णी व शेतकरी.