घेरडी येथील महावितरणच्या उपकेंद्रात वरिष्ठ यंत्रचालक जाकीर इमामसाब मुलाणी, कर्मचारी बाळू प्रकाश कुंभार, सुरज बाळू हत्तीकर असे बसले होते. दरम्यान २५ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास धनराज श्रीमंत माने, युवराज श्रीमंत माने या दोघांनी कनिष्ठ शाखा अभियंता अशोक आलदर यांना शिवीगाळ करीत होते. यावेळी धनराज माने याने मुलाणी यांच्या हातातील मोबाईल हाताला हिसडा देऊन पाडला. तसेच त्याने व युवराज माने यांनी शिवीगाळ करुन तोंडावर, डोक्यात, पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यादरम्यान कनिष्ठ अभियंता सूर्याबा आलदर हे त्या ठिकाणी आले असता त्यांनाही दोघा भावांनी तुम्ही जर केस करायला गेलात तर गाडी अंगावर घालून जिवे मारुन टाकीन, अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत वरिष्ठ यंत्रचालक जाकीर इमामसाब मुलाणी (रा. घेरडी) यांनी फिर्याद दाखल केली असून धनराज श्रीमंत माने व युवराज श्रीमंत माने (रा. घेरडी) या दोघा भावांविरुद्ध भादंवि ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.