सोलापूर : कृषिप्रधान भारताचा मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीत स्वत:ला झोकून देत मागील पंधरा ते वीस वर्षापासून स्वत: कुळव हाकत कोळपणी ते नांगरणी ,पेरणी अशी मशागतीची सर्व कामे करणारी मुमताज मुस्तफा शेख हे अफलातून व्यक्तीमत्त्व़ साधारणपणे मराठी माध्यमातून बारावीपर्यंत शिक्षण घेऊनसुद्धा शेतीच करायची हा दृढनिश्चय मनात ठेऊन त्या काळ्या आईची सेवा इमानेइतबारे करत आहेत. त्यांना मुले नाहीत पण प्रधान्या आणि सर्ज्या ही जित्राबाच त्यांची मुले अन सवंगडी़ त्यांच्या मदतीने एखाद्या पुरुषाप्रमाणे सर्व कामे करणारी मुमताज हिरजचे स्वाभिमान आहे. वडिलोपार्जित शेती, चुलत्यांची शेती अशी पाच एकर शेती त्या स्वत: कसतात़ शेतातील बैलेजुंपून स्वत: कोळपणी तर करतात, नांगरणी, पेरणी करतात़ पीक आल्यावर काढणीची सर्व कामे ती प्रामाणिकपणे करते़.
सोमवारी सायंकाळी एकट्याच शेतात राबताना पाहून त्यांच्याशी संवाद साधला. आणि त्यांना बोलते केले . त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या़ पंधरा वीस वर्षापूर्वी स्त्री अनेक सामाजिक बंधनात असताना माझ्या सारख्या सुशिक्षित मुलींनी शेती करण्याचा निर्णय घेतला .अनेक संकटांचा सामना करीत मागील वीस वर्षांपासून शेतात पुरुष जी कामे करतात ती सर्व कामे करते. आज मुलीं सर्वच क्षेत्रात मोठ्या हिंमतीने यशस्वी होत आहेत़ आपल्या कृषिप्रधान देश अधिक सुजलाम सुफलाम होण्यासाठी सध्याच्या युवापिढीतील युवतींसाठी शेती उत्तम पर्याय असून त्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे . - मुमताज मुस्तफा शेख, महिला शेतकरी, हिरज ता. उत्तर सोलापूर.