आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : जुळे सोलापुरातील पाच बेकायदा बांधकामावर सोमवारी मनपाच्या पथकाने हातोडा मारुन जमीनदोस्त केले. जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनीतील बनशंकरी नगरात असलेल्या ब्लॉक नं. १२ मध्ये शिवलिंगप्पा आनंदपूरकर यांनी अंबर बिर्याणी हाऊसमध्ये फ्रंट मार्जीनमध्ये विनापरवाना बांधकाम केले होते. हे बांधकाम पथकाने हटविले. त्याचबरोबर प्लॉट नं. १९ मधील प्रचंडे यांनी फ्रंट मार्जीनमधील पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकाम करून दुकान थाटले होते. हे बांधकाम काढण्यात आले. प्लॉट नं. २३ मध्ये श्री सिद्धेश्वर दुग्धालयचे फ्रंट मार्जीनमधील पार्किंगमध्ये बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आले होते. नोटीस देऊनही त्यांनी बांधकाम न काढल्याने पथकाने हे बांधकाम हटविले. प्लॉट नं. २४ मध्ये सुनील आबुटे यांनी फ्रंट मार्जीनमधील पार्किंगमध्ये बांधकाम करून रहिवासासाठी वापर सुरू केला होता. हे बांधकाम पथकाने काढून टाकले. प्लॉट नं. ३६ मधील विनोद म्हेत्रस यांनी फ्रंट मार्जीनमधील पार्किंगमध्ये बांधकाम करून निवासासाठी वापर सुरू केला होता. हे बांधकाम हटविण्यात आले. त्याचबरोबर न्यू पाच्छापेठेतील विठ्ठल घनाते यांनी फ्रंट मार्जीनमध्ये विनापरवाना केलेले बांधकाम पाडण्यात आले. बांधकाम परवाना विभागाचे उप अभियंता रामचंद्र पेंटर, सहायक अभियंता खानापुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोन महिन्यापूर्वी महापालिकेने अशीच कारवाई करुन नामांकित हॉटेलसह शहरातील अनेक बेकायदेशीर बांधकामे पाडली होती. आता ही मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. शहराच्या गावठाण भागाबरोबरच हद्दवाढ भागात अणखी काही अशी बांधकामे असून ती हटविण्यासाठी कारवाई ही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. ज्यांनी अशा प्रकारे अतिक्रमण करुन बांधकाम केले आहे त्यांनी ते स्वत:हून हटवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.-----------------बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी आतापर्यंत ३४0 मिळकतदारांना नोटिसा दिल्या आहेत. त्यापैकी २८८ व्यावसायिक तर ५२ मंगल कार्यालये आहेत. यात मनपाने २९ ठिकाणी पाडकामे करून बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त केली आहेत. ४८ जणांनी स्वत:हून बेकायदा बांधकाम काढून घेतले आहे. २६ जणांना पाडकाम केलेला खर्च वसूल करण्याची नोटीस बजावली आहे.
सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामावर महापालिकेचा हातोडा, पाच ठिकाणी पाडकाम सुरू, ३४० मिळकतदारांना दिल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:04 PM
जुळे सोलापुरातील पाच बेकायदा बांधकामावर सोमवारी मनपाच्या पथकाने हातोडा मारुन जमीनदोस्त केले.
ठळक मुद्देबेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी आतापर्यंत ३४0 मिळकतदारांना नोटिसा दिल्या बांधकाम परवाना विभागाचे उप अभियंता रामचंद्र पेंटर, सहायक अभियंता खानापुरे यांच्या पथकाने ही कारवाई केलीशहराच्या गावठाण भागाबरोबरच हद्दवाढ भागात अणखी काही अशी बांधकामे असून ती हटविण्यासाठी कारवाई ही लवकरच हाती घेण्यात येणार