पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुतळाबाई शिवराज मलगोंडा (वय ३३) हिच्याशी आरोपींचा काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे मध्यंतरी पुतळाबाई माहेरी वागदरी येथे राहण्यास गेली होती. वाद मिटवून पुन्हा नांदण्यास आणले होते. मात्र तिच्या चारित्र्यावर संशय घेत सतत मानसिक त्रास देण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी प्रॉपर्टी वाटणीच्या वादातून भांडण झाले होते. यात मयत महिलेने आरोपींविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला होता. अखेर बुधवारी सकाळी ११ वाजण्यापूर्वी राहत्या घरात आरोपी शिवराज बसवराज मलगोंडा (पती), देवराज बसवराज मलगोंडा (दीर), गंगोत्री देवराज मलगोंडा (जाऊ) या तिघांनी मिळून उशीच्या साहाय्याने तोंड दाबून तिचा खून केल्याची फिर्याद पुतळाबाईचा भाऊ बसवराज मल्लिनाथ शेळके यांनी दिली आहे.
पुतळाबाईंच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पुतळाबाईंचे पती शिवराज मलगोंडा यास पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार करीत आहेत.
----
ठाण्यात ठिय्या मारताच गुन्हा दाखल
पोलिसांच्या उपस्थितीत घरातून मयत पुतळाबाईस रुग्णवाहिकेमधून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे घोषित केले. मात्र गुन्हा दाखल होत नसल्याने नातेवाइकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार देत पोलीस ठाण्यात ठिय्या मारला. अखेर गुन्हा नोंदला आहे. रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
----