भीमा सदा ढाणे (वय ५२, रा. नागणेवाडी, ता. मंगळवेढा) हा १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून राहत्या घरातून घरगुती कामाकरिता घराबाहेर गेला होता. तो परतला नाही, म्हणून तो बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवेढा पोलिसांत दाखल होती.
सदर व्यक्तीस बेपत्ता तारखेपासून २१ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेपूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने मंगळवेढा ते सोलापूर जाणाऱ्या रोडच्या उजव्या बाजूस असलेल्या कॅनॉललगत हरी बाबू घाटूळ यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली निर्मनुष्य, निर्जन ठिकाणी नेऊन अज्ञात कारणावरून त्याच्याशी झटापट करून त्याच्या गळ्यात सुती रस्सीने गळफास लावून त्याच रस्सीने त्यास लिंबाच्या झाडास बांधून त्याचा खून केला, अशी फिर्याद ओंकार विश्वास भोसले (रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर) यांनी मंगळवेढा पोलिसांत दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध भा.दं.वि.सं. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे हे करीत आहेत.