करकंब : नायलॉनच्या दोरीने हातपाय बांधून मारहाण करीत पांढरेवाडीतील एका टेम्पोचालकाचा खून करण्यात आला. या प्रकरणी करकंब पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
उमेश शंकर घाटे (वय ३७, रा. पांढरेवाडी, ता. पंढरपूर) असे खून झालेल्या टेम्पोचालकाचे नाव असून, बुधवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचा मृतदेह करकंब पोलीस ठाण्यात काहीजणांनी आणला. त्यानंतर तो पत्नीच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार उमेश घाटे टेम्पोचालक म्हणून काम करीत होते. त्यांना एक टेम्पो (एमएच १३ सीयू १८७५) चालविणेसाठी बोलावले गेले होते. हे काम आल्याने दोन दिवसांपूर्वी ते बाहेर पडले होते. प्रवासादरम्यान हणमंत युवराज भोसले, राजाराम बाळू भोसले (दोघे रा. जाधववाडी) हे सोबत होते. त्यांनीच हातपाय बांधत मारहाण करून त्यांचा खून केल्याचा संशय पत्नी नीता घाटे यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हे खून प्रकरण (जाधववाडी ते बिलासपूर छत्तीसगढ़) प्रवासादरम्यान घडले आहे.
याबाबत नीता घाटे यांनी करकंब पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील करीत आहेत.
----
०८ उमेश घाटे