शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

खून करण्यापुर्वी चहातून दिल्या होत्या झोपेच्या दहा गोळ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:31 PM

सोने अन् पैशासाठीच राजेशचा झाला खून; सहाय्यक पोलीस आयुक्तांची माहिती

ठळक मुद्देअ‍ॅड. राजेश कांबळे यांचा खून दि. ८ जून २०१९ रोजी बंटी खरटमल याच्या पांडुरंग वस्ती येथील राहत्या घरी झालागुन्ह्याच्या दृष्टीने आणखीन पुरावा संकलित करावयाचा आहे. असेही न्यायालयात सांगण्यात आलेसंजय उर्फ बंटी खरटमल याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबावरून अ‍ॅड. सुरेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले

सोलापूर : अ‍ॅड. राजेश कांबळे यांचा खून अंगावरील सोने व पैशासाठीच झाला आहे. आजवरच्या तपासात अन्य कोणतेही कारण पुढे आले नाही. वकील सुरेश चव्हाण हा तपासाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे आणखी चौकशी सुरू आहे अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त महावीर सकळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

अ‍ॅड. राजेश कांबळे यांचा खून दि. ८ जून २०१९ रोजी बंटी खरटमल याच्या पांडुरंग वस्ती येथील राहत्या घरी झाला. दि. १२ जून २०१९ रोजी हा खून उघडकीस आला. संजय उर्फ बंटी खरटमल याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबावरून अ‍ॅड. सुरेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. सुरेश चव्हाण याला १५ जून २०१९ रोजी न्यायालयात उभे केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. 

कोठडीमध्ये बंटी खरटमल व सुरेश चव्हाण या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. आजवरच्या तपासात बंटी खरटमल याने अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या अंगावरील सोने व पैशासाठीच खून केल्याचे सांगत आहे. बंटीच्या जबाबावरून अटक करण्यात आलेला दुसरा संशयित आरोपी अ‍ॅड. सुरेश चव्हाण हादेखील पोलीस कोठडीत आहे. मात्र तो पोलिसांच्या चौकशीला प्रतिसाद देत नाही. याच प्रकरणात अटक असलेला सराफ श्रीनिवास येलदी याचीही चौकशी सुरू आहे. आजवरच्या कालावधीत सर्वांगाने तपास करण्यात आला आहे. पक्षकारावरून कोणता वाद होता का?, पैशाचा व्यवहार कोणता होता का ? किंवा अन्य कोणते कारण होते का ? याचा तपास घेण्यात आला. तपासातून काही निष्पन्न झाले नाही. सध्याच्या स्थितीला अ‍ॅड. राजेश कांबळे यांचा खून केवळ पैसे आणि दागिने याच्यासाठीच झाला असल्याचे दिसून येत आहे असे सहायक पोलीस आयुक्त महावीर सकळे यांनी सांगितले.         

सुरेश चव्हाण याला तीन दिवसांची पोलीस कोठडी- आरोपी अ‍ॅड. सुरेश चव्हाण याला सोमवारी न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची पोलाीस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा तपास शीघ्रगतीने करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के. अनभुले यांच्यासमोर सुरेश चव्हाण याला उभे करण्यात आले होते. न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत, मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. रजाक शेख तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. डी.जी. चिवरी यांनी काम पाहिले. 

चहातून दिल्या होत्या झोपेच्या दहा गोळ्या...- खून करण्याच्या अगोदर बंटी खरटमल याने अ‍ॅड. राजेश कांबळे यांना आपल्या घरी नेले होते. तेथे त्याने चहा केला व कपात झोपेच्या १० गोळ्या टाकून तो पिण्यास दिला होता. झोपेच्या गोळ्या अ‍ॅड. सुरेश चव्हाण याने दिल्या होत्या, असे बंटी खरटमल याने सांगितले आहे. सुरेश चव्हाण याच्याकडे चौकशी केली असता त्याने गोळ्यांबाबत काही माहीत नसल्याचे सांगत आहे. खून करण्यासाठी सुरेश चव्हाण याने बंटी खरटमल याला वेळोवेळी मार्गदर्शन व मदत केली असल्याचेही बंटी याने सांगितले आहे. त्यामुळे याचा सखोल तपास होण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचाही युक्तिवाद फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयासमोर केला. 

आणखी पुरावे हवे आहेत- सुरेश चव्हाण याने बंटी खरटमल याच्याबरोबर फोनवर बोलल्याचे सीडीआरवरून स्पष्ट झाले आहे, मात्र तो त्याचा मोबाईल काढून देत नाही. सुरेश चव्हाण याच्याकडे चौकशी करून मोबाईल हस्तगत करायचा आहे. सुरेश चव्हाण हा बंटी खरटमल याच्यासोबत फिरून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सामान खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याच्या दृष्टीने आणखीन पुरावा संकलित करावयाचा आहे. असेही न्यायालयात सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस