शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

गोरडवाडी येथे प्रेमासाठी आईनेच केला दोन चिमुकल्यांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 2:52 PM

प्रेमासाठी आईने पोटच्या चिमुकल्यांचा खून केल्याचा प्रकार गोरडवाडी (ता़ माळशिरस) येथे घडल्याचे उघडकीस आले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळशिरस दि ११ : प्रेमासाठी आईने पोटच्या चिमुकल्यांचा खून केल्याचा प्रकार गोरडवाडी (ता़ माळशिरस) येथे घडल्याचे उघडकीस आले़ याबाबत त्या निर्दयी आईविरोधात माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़पोटच्या चिमुकल्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना पुरले़ मात्र ते दोन चमुकले कसे दगावले याचे गुढ कायम होते, मात्र याची माहिती खबºयामार्फत पोलिसांना मिळाली़ या दोन बालकांचे मृतदेह उकरून काढून तपासणीसाठी सोलापूरला पाठविण्यात आले़ त्यानंतर या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस आला़ ही दोन चिमुकले प्रेमात अडसर ठरत असल्या कारणाने आईनेच चक्क मुलांचा खून केला़गोरडवाडी येथील संजय शंकर मिसाळ (वय २५) यांचे लग्न गावातील आप्पा सोपान आवळे यांची मुलगी सोनाली हिच्याशी  ४ वषापूर्वी  झाले होते़ त्यांना आदर्श ऊर्फ संभव (वय  २ वर्ष ) व  प्रशांत (वय ४  महिने) अशी मुले झाली़ दरम्यान सोनालीचे गावातील हरी तानाजी शिरतोडे याच्याशी अनैतिक संबंध जुळले़ सोनालीला त्याच्याशी लग्न करायचे होते, यासाठी ही मुले अडसर ठरत होती़ त्यासाठी या मुलांचा कायमच काटा काढला तर आपल्या प्रेमात अडसर होणार नाहीत, असा विचार करुन सोनालीने आपल्या दोन्ही मुलांचा चक्क खून केला, मात्र हा अपघात समजून ग्रामस्थांनी मुलांचे दफण केले. मात्र हा घातपात असल्याची खबर पोलिसांना मिळाली़ त्यानंतर हा प्रकार समोर आला़ याबाबत संजय शंकर मिसाळ  याने  सोनाली संजय मिसाळ, आप्पा सोपाण आवळे, काका आप्पा आवळे, हरी तानाजी शिरतोडे (सर्व रा़ गोरडवाडी) यांच्या विरुद्ध फिर्याद दिली असून कलम ३०२, ५०६, २०१, ३४ या कलमान्वये माळशिरस पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे़ अधिक तपास पोनि अश्विनी शेंडगे करीत आहेत़ 

-------------------------------आता कोणाला खाऊ देऊगोरडवाडी येथे मिसाळ कुटुंब मोलमजुरी करुन  राहत होते. ही घटना घडली़ त्या दिवशी या चिमुकल्यांचा बाप कामावरून घरी येताना खाऊ घेऊन आला़ ते मुलांना खाऊसाठी उठवू लागले़ मात्र दोन्ही मुले मृत असल्याचे लक्षात आले. आता हा खाऊ मी कोणाला देऊ म्हणून त्यांनी टाहो फोडला़  वासनेसाठी प्रियकराबरोबर पळून जाण्यास अडसर ठरणाºया पोटच्या गोळ्याला संपवून, संसाराची होळी करू शकते हा प्रकार आईपणाला काळीमा फासणारे आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या असून या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केले जात आहे़