शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लाखोंच्या गुप्तधनाची परस्पर विल्हेवाट; बार्शीतील सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 3:51 PM

उपळेतील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार : चार वर्षांपूर्वी सापडला होता हंडा

ठळक मुद्देगुप्तधन मिळाल्यानंतर मंदिराचा कारभार करणाºयांना बोलावून सर्वांनी गुप्तधनाची वाटणी आपापसात करून घेतलीगावातील दिलीप कल्याण बुरगुटे यांनी या गुप्तधनाच्या अफरातफरीबाबत पोलिसात तक्रार दिली होती.सात आरोपींकडून ७६ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला व न्यायालयापुढे हजर केले

बार्शी : बार्शी तालुक्यातील उपळे (दु.) या गावातील श्रीराम मंदिरासमोरील जागेचे पाच वर्षांपूर्वी खोदकाम करताना मोगल काळातील मिळालेले खापरी हंड्यात व एका चरवीत ठेवलेले पुरातन गुप्तधन सोन्या-चांदीच्या दागिन्यांची वाटणी व त्याची परस्पर विल्हेवाट लावणाºया ११ आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७६ लाख ५० हजार रुपयांचे सव्वादोन किलो सोने तर साडेतीन लाखांची ९ किलो चांदी जप्त करून नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अटक केलेल्या सात आरोपींमध्ये अरविंद कचरूलाल वखारिया (६५), विकास आप्पा पाटील (४६), सूर्यकांत नवनाथ बरबडे (४५), सतंजय शशिकांत कुलकर्णी (५०), गोरख दिगंबर बुरगुटे (६३), विलास कल्याण बुरगुटे (६२) व नंदकुमार बुरगुटे (४३, सर्व रा. उपळे दु.) यांचा समावेश आहे. त्यांना २९ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, इतर नवनाथ जगदाळे, महादेव माळी, महादेव मांजरे, विनोद बुरगुटे हे चार जण फरार आहेत.

गुप्तधन मिळाल्यानंतर मंदिराचा कारभार करणाºयांना बोलावून सर्वांनी गुप्तधनाची वाटणी आपापसात करून घेतली. गावात कुणकुण लागल्यावर मंदिरास सोन्याचा कळस बसविण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याची पूर्तता केली नाही. शिवाय या गुप्तधनाची माहितीही शासनास कळवली नाही. गावातील दिलीप कल्याण बुरगुटे यांनी या गुप्तधनाच्या अफरातफरीबाबत पोलिसात तक्रार दिली होती.याचा तपास बार्शी विभागीय पोलीस अधीक्षक संजय नाईक-पाटील व वैराग पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कापसे यांनी करून अटक केलेल्या सात आरोपींकडून ७६ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला व न्यायालयापुढे हजर केले. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि. ४०६, ४२४, १८३, ४७७ व भारतीय पुरातत्त्व कायदा कलम २० व २१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

दागिन्यांच्या स्वरुपात होते गुप्तधन- जानेवारी-२०१४ मध्ये गावातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी जागेचे उत्खनन करत असताना मोगल काळातील तीन खापरी हांडे व एक चरवी मिळाली होती. त्यात सोन्या-चांदीचे दागिने व गुप्तधन मिळाले होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसThiefचोरCrime Newsगुन्हेगारी