अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पंचतत्त्वांच्या संवर्धनावर आधारित माझी वसुंधरा अभियानाची गेल्यावर्षी राज्यात सुरुवात झाली. सांगोला नगरपरिषदेने मागील वर्षी या अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात ११ वा क्रमांक पटकाविला होता. नियोजनबद्ध पद्धतीने केलेले वृक्षारोपण, वॉटर मीटरद्वारे पाण्याची बचत, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाद्वारे पाण्याचा पुनर्वापर, सोलर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन आदी नगरपरिषदेने केलेल्या कामांची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
यावेळी सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा राणी माने, उपाध्यक्ष प्रशांत धनवजीर, गटनेते सचिन लोखंडे, गटनेते आनंदा माने, आरोग्य सभापती रफिक तांबोळी, पाणीपुरवठा सभापती शोभा घोंगडे, नगरसेविका स्वाती मगर, नगरसेविका स्वाती मस्के आदी उपस्थित होते.
कोट :::::::::::
वृक्षलागवड, संवर्धन, काटकसरीने पाण्याचा वापर, ओल्या कचऱ्यावर होम कंपोस्टिंग या व इतर बाबतीत नागरिकांच्या सहकार्याने सांगोला शहरास हरित शहर करण्याचा प्रयत्न असेल.
- राणी माने,
नगराध्यक्षा
कोट :::::::::::::::::::
शहरातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने यावर्षी देखील माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने भरीव काम करण्याचा प्रयत्न असेल.
- कैलास केंद्रे
मुख्याधिकारी, सांगोला